ETV Bharat / sitara

'दबंग ३'च्या सेटवरून सलमान नंतर सोनाक्षीचाही लूक होतोय व्हायरल, पाहा लिक फोटो - अरबाज खान

काही दिवसांपूर्वी सलमान खानने सेटवर मोबाईल फोन बॅन केले होते. तरीही त्यांचे लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता या चित्रपटाच्या सेटवरून सोनाक्षी सिन्हाचाही लूक व्हायरल झाला आहे.

'दबंग ३'च्या सेटवरून सलमान नंतर सोनाक्षीचाही लूक होतोय व्हायरल, पाहा लिक फोटो
author img

By

Published : Aug 20, 2019, 1:36 PM IST

मुंबई - सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांची मुख्य भूमिका असलेल्या 'दबंग ३'ची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा पाहायला मिळते. 'दबंग' मधील 'चुलबुल पांडे' आणि 'रज्जो हे पात्र प्रेक्षकांच्या मनात रुजले आहेत. त्यामुळेच आता पुन्हा सलमान आणि सोनाक्षी या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'दबंग ३'च्या सेटवरील दोघांचेही फोटो लिक झाले आहेत. सलमान खाननंतर आता सोनाक्षीचाही 'रज्जो'च्या भूमिकेतीव लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'दबंग' आणि 'दबंग २' चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर आता 'दबंग ३' बद्दलही चाहते आतुर आहेत. त्यामुळेच या चित्रपटाबद्दल चाहत्यांना जाणून घेण्यासाठी सलमान खान सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट्स देत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने सेटवर मोबाईल फोन बॅन केले होते. तरीही त्यांचे लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता या चित्रपटाच्या सेटवरून सोनाक्षी सिन्हाचाही लूक व्हायरल झाला आहे.

सध्या सोनाक्षीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. रज्जोच्या लूकमध्ये ती पाहायला मिळते. हे फोटो जयपूर येथील आहेत. चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे फोटो देखील लिक झाले आहेत.

या चित्रपटात महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिदेखील पदार्पण करणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, 'दबंग ३'मध्ये 'चुलबुल पांडे'चा भूतकाळ दाखवण्यात येणार आहे. सईसोबतही सलमानची लव्ह केमेस्ट्री चित्रपटात पाहायला मिळेल.

अरबाज खान, के. सुदीप यांचीही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.