ETV Bharat / sitara

१५ वर्षांची असताना ८ जणांनी केला होता अत्याचार, 'केबीसी'मध्ये सुनीता कृष्णन यांंची 'आपबीती'

सुनीता कृष्णन या लैगिंक शोषणाला बळी पडणाऱ्या महिला आणि मुलींच्या पुनर्वसनासाठी कार्य करतात. आपल्या एनजीओच्या माध्यमातून सुनीता यांनी आजवर २२ हजारांपेक्षा जास्त मुलींच्या पुनर्वसनाचं कार्य केलं आहे. त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार देऊन गौरवलेही आहे.

author img

By

Published : Oct 18, 2019, 11:29 AM IST

Updated : Oct 18, 2019, 2:06 PM IST

१५ वर्षाची असताना ८ जणांनी केला होता बलात्कार, 'केबीसी'मध्ये सुनीता कृष्णन यांनी सांगीतली आपबीती

मुंबई - छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शोमध्ये सामान्य ज्ञानासोबतच समाजातील काही धक्कादायक घटनांचाही उलगडा होत असतो. दर आठवड्यात या रिअ‌ॅलिटी शोच्या विशेष भागात समाजकार्य करणाऱ्या काही व्यक्ती सहभागी होत असतात. 'कर्मवीर' म्हणून हा भाग प्रसारित होत असतो. यावेळी समाजकार्य करणाऱ्या सुनीता कृष्णन यांचा सहभाग राहणार आहे. सध्या या भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सुनीता कृष्णन या त्यांच्या जीवनात घडलेल्या कठिण प्रसंगांबद्दल सांगताना दिसतात.

सुनीता कृष्णन या लैगिंक शोषणाला बळी पडणाऱ्या महिला आणि मुलींच्या पुनर्वसनासाठी कार्य करतात. मात्र, त्या अवघ्या १५ वर्षांच्या असताना त्यांच्यावर ८ जणांनी बलात्कार केला होता. त्यांनी हा धक्कादायक खुलासा केल्यानंतर महानायक अमिताभ बच्चनही हादरले होते.

आपल्या एनजीओच्या माध्यमातून सुनीता यांनी आजवर २२ हजारापेक्षा जास्त मुलींच्या पुनर्वसनाचं कार्य केलं आहे. त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार देऊन गौरवलेही आहे.

समाजातील महिलांसाठी झटणाऱ्या सुनीता यांच्या कार्यात बरेच अडथळेही आले. त्यांच्यावर जीवघेणे हल्लेदेखील झाले. आत्तापर्यंत त्यांच्यावर १७ हल्ले झाल्याचा खुलासाही त्यांनी केला. मात्र, या हल्ल्यांना न घाबरता शेवटच्या श्वासापर्यंत आपण महिलांसाठी कार्य करत राहु, असं त्या या प्रोमोमध्ये बोलताना दिसतात.

Intro:Body:

१५ वर्षाची असताना ८ जणांनी केला होता बलात्कार, 'केबीसी'मध्ये सुनीता कृष्णन यांनी सांगीतली आपबीती

मुंबई - छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शोमध्ये सामान्यज्ञानासोबतच समाजातील काही धक्कादायक घटनांचाही उलगडा होत असतो. दर आठवड्यात या रिअ‌ॅलिटी शोच्या विशेष भागात समाजकार्य करणाऱ्या काही व्यक्ती सहभागी होत असतात. 'कर्मवीर' म्हणून हा भाग प्रसारित होत असतो. यावेळी समाजकार्य करणाऱ्या सुनीता कृष्णन यांचा सहभाग राहणार आहे. सध्या या भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सुनीता कृष्णन या त्यांच्या जीवनात घडलेल्या कठिण प्रसंगांबद्दल सांगताना दिसतात.

सुनीता कृष्णन या लैगिंक शोषणाला बळी पडणाऱ्या महिला आणि मुलींच्या पुनर्वसनासाठी कार्य करतात. मात्र, त्या अवघ्या १५ वर्षाच्या असताना त्यांच्यावर ८ जणांनी बलात्कार केला होता. त्यांनी हा धक्कादायक खुलासा केल्यानंतर महानायक अमिताभ बच्चनही हादरले होते.

आपल्या एनजीओच्या माध्यमातून सुनीता यांनी आजवर २२ हजारापेक्षा जास्त मुलींच्या पुनर्वसनाचं कार्य केलं आहे. त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार देऊन गौरवलेही आहे.

समाजातील महिलांसाठी झटणाऱ्या सुनीता यांच्या कार्यात बरेच अडथळेही आले. त्यांच्यावर जीवघेणे हल्लेदेखील झाले. आत्तापर्यंत त्यांच्यावर १७ हल्ले झाल्याचा खुलासाही त्यांनी केला. मात्र, या हल्ल्यांना न घाबरता शेवटच्या श्वासापर्यंत आपण महिलांसाठी कार्य करत राहु, असं त्या या प्रोमोमध्ये बोलताना दिसतात.

सुनीता कृष्णन यांचा हा भाग लवकरच या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. समाजामध्ये बदल घडवण्यासाठी आपल्याला आपला विचारही बदलावा लागेल, असं बिग बी देखील या प्रोमोमध्ये म्हणताना दिसतात.

Conclusion:
Last Updated : Oct 18, 2019, 2:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.