मुंबई - कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी संयम आणि सुरक्षिततेची खबरदारी अतिशय आवश्यक आहे. जगभरातून हा कोरोना भारतातही पसरत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष खबरदारी बाळगण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. कलाविश्वातील कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करून कविता, चारोळी आणि गाण्यांच्या मार्फत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मराठीतील सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी देखील एका पोवाड्याद्वारे कोरोनासंदर्भात जगजागृती करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोवाड्यातून त्यांनी कोरोनाशी धाडसाने लढा देण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -अभिजीत भट्टाचार्यांच्या 'या' सुप्रसिद्ध गाण्यावरून तरुणाने तयार केलं कोरोना सॉन्ग, व्हिडिओ व्हायरल
कोरोनाने जरी आपल्यावर हल्ला केला असेल, तरी कोरोनाला न घाबरता त्याचा हिमतीने सामना करूयात, असा सल्ला त्यांनी या व्हिडिओतून दिला आहे.
हेही वाचा -सहाबहार गाण्यातून नेहा कक्करने केले 'जनता कर्फ्यू'चे आवाहन