ETV Bharat / sitara

Shweta Tiwari Controversy : श्वेता तिवारीचे वादग्रस्त विधान, म्हणते: ''माझ्या 'ब्रा'ची साइज...'' - श्वेता ब्रा

श्वेता तिवारीने ब्रा आणि देवाबाबत वादग्रस्त विधान ( shweta tiwari controversial comment ) केले आहे. तिच्या आगामी वेब सीरिजबद्दल ती भोपाळमध्ये मीडियाशी बोलत होती. तिच्या विधानावरुन एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

श्वेता तिवारी
श्वेता तिवारी
author img

By

Published : Jan 27, 2022, 1:10 PM IST

मुंबई - लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्वेता तिच्या सौंदर्य आणि आकर्षक फिगरसाठी खूप चर्चेत असते, पण यावेळी अभिनेत्री चर्चेत येण्याचे कारण तिची आकर्षक फिगर आणि सुंदर दिसणे नसून देवावर केलेले वादग्रस्त विधान आहे. एका पत्रकार परिषदेत श्वेताने ब्रा आणि देव याबद्दल हे वादग्रस्त विधान ( shweta tiwari controversial comment ) केले होते. यावर तिला वाईटरित्या ट्रोल केले जाऊ शकते.

श्वेताचे वादग्रस्त विधान

श्वेता तिवारी तिच्या आगामी वेब सीरिजच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत पोहोचली होती. यावेळी ती मालिकेच्या संपूर्ण टीमसोबत उपस्थित होती. अशा परिस्थितीत श्वेता तिवारीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी हिंदीत बोलताना श्वेता तिवारी म्हणाली, 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे'.

श्वेताची आगामी वेब सीरिज 'शो स्टॉपर' फॅशनशी संबंधित आहे. या संदर्भात शोची टीम भोपाळला पोहोचली. यादरम्यान श्वेताने हे बोलून तिची कोंडी केली आहे. मीडियाशी बोलताना श्वेताने हे वादग्रस्त विधान गंमतीने केले असले तरी या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहे.

श्वेताचे वादांशी नाते

श्वेता तिवारी आजवर तिच्या कौटुंबिक कलहामुळे वादात सापडली आहे. श्वेताने दोन लग्न केली असून दोन्ही लग्नांमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पहिले लग्न तिने राजा चौधरीशी आणि दुसरे अभिनव कोहलीशी केले. श्वेता तिच्या दुस-या लग्नामुळेही खूश नाही आणि त्यांच्यातील भांडणे अनेकदा मीडियात समोर आली आहेत.

हेही वाचा - मौनी रॉयने सूरज नांबियारसोबत घेतले सात फेरे, पाहा लग्नाचे फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.