ETV Bharat / sitara

कोरोना संसर्ग टाळण्याचे सारे नियम पाळून 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेच्या शूटिंगला सुरुवात - Dr. Amol Kolhe MP NCP

होणार, नाही होणार, कधीपासून सुरू होणार असे अनेक तर्कवितर्क सुरू असतानाच काही मालिकांचं शुटिंग आजपासून मुंबईत सुरू करण्यात आलं आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेच्या शुटिंगला आजपासून गोरेगाव चित्रनगरी येथे सुरुवात करण्यात आली आहे.

Shooting of 'Swarajyajanani Jijamata
स्वराज्यजननी जिजामाता शुटिंग सुरू
author img

By

Published : Jun 23, 2020, 6:39 PM IST

मुंबई - खर तर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज असोसिएशन अ‌ॅड सिने आणि टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन यांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुंबईत एकही शुटिंग सुरू होऊ देणार नसल्याचं पत्रक काढलं होतं. मात्र त्याआधीच राज्य शासनाने काही निर्मिती संस्थांना मुंबईत शुटिंग करण्याची परवानगी दिलेली होती. त्यामुळे अधिक काळ न थांबता गेल्या दोन दिवसात सेट सॅनिटाईज करून आजपासून प्रत्यक्ष शुटिंगला सुरुवात करण्यात आली. यासाठी सेटवर कलाकारांना सीन देताना सोडून इतर वेळी मास्क वापरणे बंधनकारक आहे. याशिवाय तंत्रज्ञ आणि कामगार यांनादेखील शूटिंग करताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

संघटनांचा विरोध मग शुटिंग सूरु कसं झालं..?

एकीकडे फेडरेशन आणि सिंटा दोन्हीचा शुटिंगला विरोध असताना प्रतीक्ष शूटिंगला सुरूवात झालीच कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत सोनी मराठी वाहिनीकडे विचरणा केली असता, त्यानी ज्या निर्मिती संस्थाकडे कंत्राटी पद्धतीने कामगार काम करतात त्याचा संघटनेशी मानधन आणि कामाच्या तासाबाबत वाद होता. मात्र स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेचे निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब प्रॉडक्शनमध्ये कामगार,तंत्रज्ञ, कलाकार सारे फिक्स मानधनावर काम करतात.त्यामुळे कंत्राटाचा प्रश्नच येत नसल्याने शुटिंग सुरू करण्यात कोणतीही अडचण आलेली नाही. दुसरं म्हणजे जे मोठे मध्यम समूह आहेत जस की सोनी, झी, स्टार त्यानी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च आणि विमा यांची जबाबदारी घेण्याची तयारी आधीच दाखवली असल्याने 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेचं शूटिंग सुरू करण्यात आलं आहे. दुसरं आणि महत्वाचं म्हणजे मराठीत अनेक कलाकार शिवसेना, मनसे किंवा इतर चित्रपट सेनेचे सदस्य असले तरीही फारच कमी जण सिंटाचे सदस्य आहेत. त्यामुळे सिंटाने घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे त्याना बंधनकारक नाही. त्यामुळे शूटिंग करायला कलाकर देखील आढेवेढे न घेता तयार झाले.

'सोनी मराठी'च्या बाकीच्या मालिकांच काय..?
'सोनी मराठी'ची स्वराज्यजननी जिजामाता ही पहिली मालिका आज पुन्हा फ्लोअरवर गेली असली तरीही बाकीच्या मालिकांच शुटिंग सुरू करायला अजून वेळ लागणार आहे. त्यांच्या आनंदी हे जग सारे, हम बने तुम बने या मालिका घोडबंदर रोड ठाणे येथे शूट होतात. त्याना ठाण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी शूटींगची परवानगी दिल्याने येत्या दोन ते तीन दिवसात या मालिकांच शुटिंग सुरू होईल. कॉमेडीची हास्यजत्रा हा रिऍलिटी शो मीरारोड येथे शूट होतो. त्याचीही परवानगी मिळाली असली तरीही प्रत्यक्ष शूटिंग मात्र 28 जून रोजी सुरू करण्यात येणार असल्याच वाहिनीने स्पष्ट केलं आहे.

फेडरेशन नक्की काय करणार..?

आज मुंबईत सुरू झालेली शूटिंग पाहता फेडरेशन आणि सिंटा यांनी काही ठिकाणी जाऊन ती हाणून पडण्याचा प्रयत्न करणार असल्याच सांगितलं आहे. कामगारांच्या सुरक्षिततेबाबत तडजोड करून एकही शूटिंग चालू देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. अस असलं तरीही मराठी मालिकांना याची झळ बसण्याची शक्यता कमीच आहे. त्यातही डॉ.अमोल कोल्हे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार असल्याने त्यांच्या वाटेला जाण्याचे धाडस कामगार संघटना दाखवण्याची शक्यता कमीच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.