ETV Bharat / sitara

ओळखा पाहू कोण? गोड आवाजात गाणारी 'ही' चिमुकली आज आहे सुप्रसिद्ध मॉडेल - स्काय ईझ पिंक

सध्या एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. या व्हिडिओमध्ये एक चिमुकली तिच्या गोड आवाजाने सर्वांवर भूरळ पाडताना दिसते. या व्हिडिओतील ही चिमुकली नक्की कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

ओळखा पाहू कोण? गोड आवाजात गाणारी 'ही' चिमुकली आज आहे सुप्रसिद्ध मॉडेल
author img

By

Published : Sep 9, 2019, 11:05 AM IST

मुंबई - सोशल मीडियावर आपल्या लाडक्या कलाकारांचे थ्रोबॅक व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळणे म्हणजे चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणीच असते. त्यामुळेच बरेचसे कलाकार आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपले काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या या फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. सध्या असाच एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. या व्हिडिओमध्ये एक चिमुकली तिच्या गोड आवाजाने सर्वांवर भूरळ पाडताना दिसते. या व्हिडिओतील ही चिमुकली नक्की कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

व्हिडिओत दिसणारी ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड आणि मॉडेल असलेली शिबानी दांडेकर आहे. शिबानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करताच या व्हिडिओला लाखो व्हिव्ज मिळाले आहेत. तसंच शिबानीच्या आवाजाचं कौतुकही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

'जाने कहा मेरा जिगर' आणि 'सत्ते पे सत्ता' ही दोन गाणी ती या व्हिडिओत गाताना दिसते. विशेष म्हणजे तिच्या वडिलांनी नव्या व्हिडिओ कॅमेरात पहिल्यांदा तिचा हा व्हिडिओ शूट केला होता. फरहान अख्तरनेही शिबानीचं कौतुक करत तिच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

हेही वाचा-फरहान-प्रियांकाची रोमँट्रीक केमिस्ट्री; पाहा, द स्काय इज पिंकमधील फोटो

दोघांचेही नाते दिवसेंदिवस बहरताना दिसते. दोघेही सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसतात. त्यांच्या लग्नाच्याही चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगल्या आहेत. मात्र, दोघांनीही अद्याप लग्नाबाबत कोणतेही वृत्त दिलेले नाही.

शिबानीने मॉडेलिंगमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आज ती सुप्रसिद्ध मॉडेल म्हणून ओळखली जाते. तर, फरहान त्याच्या आगामी 'तुफान' चित्रपटात व्यग्र आहे. लवकरच त्याचा 'स्काय ईझ पिंक' हा चित्रपटदेखील पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा-'राणी मीट आपली जिजाऊ', वीणा जगतापने घेतली शिवच्या आईची भेट

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.