ETV Bharat / sitara

शशांक केतकर : घरी स्वयंपाकघरात नवनवे प्रयोग करायला मला आवडतात! - शशांकचा किचन अनुभव

प्रेक्षकांच्या प्रेमापोटी स्टार प्रवाह वाहिनीने ‘प्रवाह दुपार’ हा नवा स्लॉट सुरु केला आहे. ‘लग्नाची बेडी’ आणि ‘मुरांबा’ या दोन मालिका दुपारच्या वेळेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ‘मुरांबा’ या मालिकेत प्रमुख भूमिका करणाऱ्या अभिनेता शशांक केतकर ने प्रेमाच्या आंबट गोड मुरांब्याची गोष्ट सांगताना आपले मनोगताही व्यक्त केले.

शशांक केतकर
शशांक केतकर
author img

By

Published : Feb 21, 2022, 7:59 PM IST

गेल्या काही वर्षांत छोट्या पडद्यावर निरनिराळे ‘प्राईम टाईम’ उदयास आले. नेहमीच्या ८ ते १० च्या स्लॉट नंतर ६ ते ८ हा स्लॉट देखील प्राईम टाईम पकडला जाऊ लागला. आता अजून एक प्राईम टाईम तयार झालाय तो म्हणजे दुपारचा प्राईम टाईम. या वेळेत गृहिणींना नवीन मालिका, शोज हवे होते कारण दुपारी फक्त झोपण्यापेक्षा नवीन मालिका पाहणे त्या पसंद करतात असे सर्व्हेमधून समोर आले होते. त्या अनुषंगाने स्टार प्रवाह वाहिनीने दुपारची मालिका ‘मुरांबा’ प्रसारित करण्यास सुरुवात केली ज्याला प्रेक्षकांचा चांगला पाठिंबाही मिळतोय.

प्रेक्षकांच्या प्रेमापोटी स्टार प्रवाह वाहिनीने ‘प्रवाह दुपार’ हा नवा स्लॉट सुरु केला आहे. ‘लग्नाची बेडी’ आणि ‘मुरांबा’ या दोन मालिका दुपारच्या वेळेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. घरी असलेल्या प्रेक्षकांना सहकुटुंब जेवणाचा आनंद घेत या मालिका पहाता येताहेत. ‘मुरांबा’ या मालिकेत प्रमुख भूमिका करणाऱ्या अभिनेता शशांक केतकर ने प्रेमाच्या आंबट गोड मुरांब्याची गोष्ट सांगताना आपले मनोगताही व्यक्त केले.

मुरांबा मालिकेविषयी सांगताना शशांक म्हणाला, “मुरांबा या शीर्षकाप्रमाणेच एक छान आंबट-गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. ही कौटुंबिक कहाणी असून नात्यांमधले ऋणानुंबध आणि त्यातला गुंता यावर भाष्य करणारी गोष्ट आहे. मी जवळपास दीड वर्षांनंतर लव्हस्टोरी मध्ये काम करतोय. मी स्टार प्रवाह वाहिनीचे मनापासून आभार मानतो कारण त्यांनी प्रवाह दुपारच्या माध्यमातून आता दुपारीही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा प्रवाह सुरु केला आहे. जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना प्रेमात पडायचं आहे त्यांच्यासाठी मुरांबा ही मालिका छान गिफ्ट आहे.” या मालिकेतील शशांक चा लूक वेगळा आहे आणि त्याविषयी अवगत करताना तो म्हणाला, “मी आणि माझी बायको प्रियांका नुकतेच आई-बाबा झालो. आई-बाबा झालो असलो तरी पूर्वीसारखंच फिट रहायचं आहे. वेटलॉस नाही मात्र फॅटलॉस केला आहे. त्यामुळे नव्या रुपात आणि नव्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटत आहे.”

शशांक अक्षय मुकादम हे पात्र रंगवतोय जे प्रेक्षकांना अतिशय भावतंय. तो आईवर जीवापाड प्रेम करणारा आणि आजीच्या धाकाखाली वाढलेला असा आहे अक्षयला नाती जपायला आवडतात. त्याबाबत बोलताना शशांक हसत हसत म्हणाला, “अक्षय आणि शशांक या दोघांमधलं साम्य असं ते म्हणजे खवय्येगिरी. स्वयंपाक घरात नवनवे प्रयोग करायला मला आवडतात. मालिकेत देखिल माझं स्वयंपाक घराशी जवळचं नातं आहे.”

आधीच्या ‘पाहिले मी न तुला’ मालिकेत शशांक केतकर ने ग्रे शेड ची भूमिका साकारली होती. ‘मुरंबा’ मध्ये शशांक पुन्हा एकदा रोमँटिक भूमिकेत आहे. “स्टार प्रवाहवसोबत जवळपास ८ वर्षांनंतर काम करतोय. मी बऱ्याच दिवसांपासून रोमँटिक भूमिकेची वाट पहात होतो. भूमिकेच्या बाबतीत तुम्ही कितीही वेगळा प्रयोग करायला गेलात तरी लव्हस्टोरीची गोष्टच वेगळी आहे. प्रेक्षकांना लव्हस्टोरी आपलीशी वाटते. मालिकेच्या नावाप्रमाणेच ही एक आंबट-गोड लव्हस्टोरी आहे. मुरांबा ज्याप्रमाणे मुरला की त्याची चव वाढते अगदी त्याचप्रमाणे मालिकेत नाती मुरताना अनुभवायला मिळताहेत”, शशांक म्हणाला.

शशांक केतकर अभिनित ‘मुरांबा’ ही मालिका प्रसारित होते स्टार प्रवाहवर दुपारी १.३० वाजता.

हेही वाचा - जान्हवी कपूरने बॅकलेस ब्लाउजमध्ये दाखवली कोमल काया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.