ETV Bharat / sitara

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर शर्लिन चोप्राने दिली वादग्रस्त माहिती, बघा काय म्हणाली.. - शर्लिन चोप्राचा गंभीर आरोप

अभिनेत्री शर्लिन चोप्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे. अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीबद्दल यापूर्वीच पूर्ण माहिती सायबर सेलला दिल्याचे तिने सांगितले आहे.

Sherlyn Chopra
शर्लिन चोप्रा
author img

By

Published : Jul 22, 2021, 7:25 PM IST

Updated : Aug 2, 2021, 3:17 PM IST

मुंबई - शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवण्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. त्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अश्लील चित्रपट बनवून काही अॅप्सवर दाखविल्याचा आरोप राज यांच्यावर आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलमध्ये प्रदीर्घ चौकशीनंतर राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.

शर्लिन चोप्रा

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने राज कुंद्रावर अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणण्यात मोलाचा हात असल्याचा आरोप केला आहे. खरं तर शर्लिनबरोबर पूनम पांडे हिनेदेखील राज कुंद्राबरोबर करार केला होता. शर्लिनने राज कुंद्राच्या बर्‍याच प्रकल्पांमध्ये काम केले आहे, त्यासाठी तिला मोठी रक्कमही देण्यात आली होती.

  • पिछले कुछ दिनों से कई पत्रकार और मीडिया रिपोर्ट्स मुझे कॉल / वॉट्सएप/ ईमेल कर रहे हैं यह कहकर कि मैं आगे आकर इस विषय पर कुछ कहूँ।
    आप को बता दूँ कि जिस व्यक्ति ने महाराष्ट्र साइबर को सबसे पहले इस विषय पर बयान दिया, वो कोई और नहीं बल्कि मैं हूँ। pic.twitter.com/9xwlOnVeT6

    — Sherlyn Chopra 🇮🇳 (@SherlynChopra) July 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अनेक मीडियाकर्मी शर्लिन चोप्राला या विषयाबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करीत होते. या बद्दल खुलासा करताना ती म्हणाली , ''या प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलच्या इन्वेस्टीगेटिंग टीमला ज्या व्यक्तीने सर्वात पहिल्यांदा जवाब नोंदवला ती मी होती. याबद्दल टीमला माहिती पुरवणारी मी होते. जेव्हा मला समन्सची नोटीस पाठवण्यात आली होती तेव्हा मी भूमीगत झाले नाही. गायब झाले नाही. हे शहर किंवा देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. मार्च 2021 मध्ये सायबर सेलच्या ऑफिसवर जाऊन मी माझा निष्पक्ष जवाब नोंदवला. या विषयावर बोलण्यासारखे खूप काही आहे. पण हा विषय न्यायालयात आहे त्यामुळे त्यावर जास्त भाष्य करु शकत नाही. मी पत्रकरांना विनंती करते की सायबर सेलकडे मी जो जवाब दिला आहे त्याबद्दलचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा.''

हेही वाचा - राज कुंद्राने दिली क्राइम ब्रांचला लाच? फरार आरोपीचा दावा

Last Updated : Aug 2, 2021, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.