मुंबई - शरिब हाश्मीचा नुकताच बनलेला 'दरबान' हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या 'खोकाबाबुर प्रत्यावर्तन' या लघुकथेवर आधारित आहे. या कथेवर आधारीत १९६० ला चित्रपट बनला होता त्यात उत्तम कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये शरिब त्याच व्यक्तिरेखेची भूमिका साकारत आहे, जी कथेचे हिंदी रूपांतर आहे. या चित्रपटात शरिब हा रायचरणची भूमिका साकारताना दिसू शकेल.
उत्तम कुमारशी तुलना केल्यावर शरिबने वृत्तसंस्थेला सांगितले, "माझी तुलना उत्तम कुमारसारख्या दिग्गजांशी करू नका. अभिनेता म्हणून मी त्यांच्या क्षमतेच्या अगदी जवळ नाही. रायचरणची व्यक्तिरेखा सुंदर आहे. मी ही भूमिका जगण्यासाठी उत्तम कामगिरी केली आहे, पण ते एक दिग्गज आहेत. "
हेही वाचा - कंगना रणौतला कायदेशीर नोटीस, अभद्र ट्विटवर माफी मागण्याची शीख संस्थेने केली मागणी
शरिब पुढे म्हणाला, "टागोर साहेबांनी रचलेली ही हृदयस्पर्शी कथा आहे आणि या कथेला आम्ही सर्व परिचित आहोत. (दिग्दर्शक) बिपीन नाडकर्णी यांनी हे सुंदरपणे रेखाटले आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षक खिळून जातील याची खात्री आहे. मीदेखील ही कथा एकाच फेरीत वाचून काढली होती.''
हेही वाचा - कंगना- दिलजीतच्या ट्विटर युध्दात स्वरा भास्करची एन्ट्री
या चित्रपटात शरद केळकर, रसिका दुग्गल आणि फ्लोरा सैनी या कलाकारांचीही भूमिका आहे. हा चित्रपट 4 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर प्रदर्शित होईल.