मुंबई - इस्त्रायली क्राईम थ्रिलरचा भारतीय अवतार असलेल्या 'हॉस्टेजेस' आपल्या दुसऱ्या सिझनसह परत येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी बनवलेली १० भागांची मालिका एका डॉक्टरची कथा आहे. टिस्का चोप्राने यात डॉक्टरची व्यक्तीरेखा साकारली आहे.
डॉक्टरच्या कुटुंबियांना त्यांच्याच घरात बंद करण्यात येते. त्यांनी एका निर्दोष व्यक्तीचा खून केला तरच त्यांची सुटका होईल अशी अट त्यांना घालण्यात येते.
हॉटस्टार स्पेशलच्या या सिरीजमध्ये रॉनित रॉय, प्रवीण दास आणि दलीप ताहिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुढच्या सीझनमध्ये हेच कलाकार असतील का हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. 'हॉस्टेजेस' या वेब सिरीजला प्रेक्षकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला होता.