ETV Bharat / sitara

सरफरोश चित्रपटाला २० वर्षे पूर्ण, मेजर डी.पी. सिंग यांची पोस्ट पाहून आमिर खान झाला भावूक - sonali bendre

या चित्रपटाशी कारगील युद्धात एक पाय गमावलेल्या मेजर डी.पी. सिंग यांच्या बऱ्याच आठवणी जुळलेल्या आहेत. २० वर्षानंतर त्यांनी हा चित्रपट पुन्हा एकदा पाहिला. त्यांनी या चित्रपटाशी जुळलेली एक आठवन सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट पाहून आमिर खानदेखील भावूक झाला.

सरफरोश चित्रपटाला २० वर्षे पूर्ण, मेजर डी.पी. सिंग यांची पोस्ट पाहून आमिर खान झाला भावूक
author img

By

Published : Jun 1, 2019, 3:16 PM IST

मुंबई - आमिर खानच्या 'सरफरोश' चित्रपटाला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली आहेत. ३० एप्रिल १९९९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला त्याकाळी प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आमिरसोबत या चित्रपटात सोनाली बेंद्रेदेखील झळकली होती.

या चित्रपटाशी कारगील युद्धात एक पाय गमावलेल्या मेजर डी.पी. सिंग यांच्या बऱ्याच आठवणी जुळलेल्या आहेत. २० वर्षानंतर त्यांनी हा चित्रपट पुन्हा एकदा पाहिला. त्यांनी या चित्रपटाशी जुळलेली एक आठवन सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट पाहून आमिर खानदेखील भावूक झाला.

मेजर डी.पी. सिंग यांनी त्यांचा एक फोटो शेअर करून 'सरफरोश'ची आठवन सांगितली आहे. '२० वर्षांपूर्वी मी आमिर खानचा सरफरोश पाहिला होता. आज पुन्हा एकदा तो पाहण्याचा योग आला आहे. त्यावेळी मी तो चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला होता. तर, आज मी तो टीव्हीवर पाहतो आहे. फरक फक्त इतकाच आहे, की ज्यावेळी मी थिएटरमध्ये गेलो होतो, तेव्हा माझे दोन्ही पाय शाबूत होते. आता टीव्हीवर पाहताना माझा एकच पाय आहे. 'ऑपरेशन विजय'चे युनिट जॉईन करण्यापूर्वी मी तो चित्रपट पाहिला होता. माझे दोन्ही पाय असताना पाहिलेला 'सरफरोश' हा माझा शेवटचा चित्रपट होता'.

Major D. P. Singh Post
मेजर डी.पी. सिंग यांनी शेअर केलेली पोस्ट

डी. पी. सिंग यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर आमिर खान खूप भावुक झाला. त्याने लगेचच या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली. तु'मची पोस्ट वाचून माझ्या अंगावर अक्षरश: शहारे आले. तुमचे शोर्य, हिंमत आणि कठिण परिस्थीतमध्ये ज्या प्रकारे तुम्ही सामोरे गेले, तुम्हाला माझा मनापासून सलाम', असे म्हणत आमिरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

amir khan
आमिर खानने शेअर केलेली पोस्ट
कारगील युद्धात अनेक जवानांना वीरमरण आले होते. या युद्धातच मेजर डी.पी. सिंग यांनी त्यांचा एक पाय गमावला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.