ETV Bharat / sitara

संस्कृती कलादर्पण पुरस्कार नामांकन जाहीर, रोहिणी हट्टंगडींना यंदाचा जीवनगौरव - kashinath ghanekar

तर चित्रपट विभागात 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर', 'न्यूड', 'मुळशी पॅटर्न' आणि 'पुष्पक विमान' या सिनेमांना सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत.

संस्कृती कलादर्पण पुरस्कार जाहीर
author img

By

Published : Apr 28, 2019, 7:43 AM IST

Updated : Apr 28, 2019, 1:00 PM IST

मुंबई - १९ व्या संस्कृती कलादर्पण पुरस्कार २०१९ ची नामांकनं नुकतीच झाली. यंदा या नामांकन सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना संस्कृती कलादर्पण जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर चित्रपट विभागात 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर', 'न्यूड', 'मुळशी पॅटर्न' आणि 'पुष्पक विमान' या सिनेमांना सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत.

अर्चना नेवरेकर आणि चंद्रशेखर सांडवे यांनी सुरू केलेल्या संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळ्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपट क्षेत्राप्रमाणे नाटक विभागात भद्रकाली प्रोडक्शनच्या 'सोयरे सकळ' आणि 'गुमनाम है कोई' तसेच सोनल प्रोडक्शनच्या 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकांना बहुतांश विभागात नामांकन मिळाली आहेत. यासोबतच 'तिला काही सांगायचंय' या नाटकाला लोकप्रिय नाटकाचा विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर 'हॅम्लेट' या नाटकासाठी सुमित राघवनला विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

संस्कृती कलादर्पण पुरस्कार जाहीर

टीव्ही मालिकांच्या विभागात झी युवावरील 'फुलपाखरू', सोनी मराठी वरील 'भेटी लागी जिवा', 'ती फुलराणी' आणि स्टार प्रवाह वरील 'छोटी मालकीण', 'छत्रीवाले', 'ललित ४०५', 'नकळत सारे घडले' या मालिकांना अनेक नामांकन मिळाली आहेत. याच मालिकांमध्ये दिसणारे चेहरे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीसाठी नामांकित आहेत. येत्या ११ मेला मुंबईतील कमालिस्तान स्टुडिओत संस्कृती कलादर्पण पुरस्कार पार पडणार आहे. यंदा ही सोनेरी रंगाची झळाळती ट्रॉफी नक्की कुणाच्या हातात दिसते त्याचा उलगडा याच दिवशी होईल.

Intro:19 व्या संस्कृती कलादर्पण पुरस्कार 2019 ची नामांकन नुकतीच जाहीर झाली. यंदा या नामांकन सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी याना संस्कृती कलादर्पण जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर चित्रपट विभागात 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर', 'नूड' 'मुळशी पॅटर्न' आणि 'पुष्पक विमान' या सिनेमाना सर्वाधिक नामांकन मिळाली आहेत.

अर्चना नेवरेकर आणि चंद्रशेखर सांडवे यांनी सुरू केलेल्या संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळा हा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपट क्षेत्राप्रमाणे नाटक विभागात भद्रकाली प्रोडक्शनच्या 'सोयरे सकळ' आणि 'गुमनाम है कोई' आणि सोनल प्रोडक्शनच्या 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाना बहुतांश विभागात नामांकन मिळाली आहेत.
तर झी मराठीच्या 'तिला काही सांगायचंय' या नाटकाला लोकप्रिय नाटकाचा विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर 'हॅम्लेट' या नाटकासाठी सुमित राघवन याला विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

टीव्ही मालिकांच्या विभागात झी युवावरील 'फुलपाखरू', सोनी मराठी वरील 'भेटी लागी जिवा', 'ती फुलराणी' आणि स्टार प्रवाह वरील 'छोटी मालकीण', 'छत्रीवली', 'ललित 405', 'नकळत सारे घडले' या मालिकांना अनेक नामांकन मिळाली आहेत. याच मालिकांमध्ये दिसणारे चेहरे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री साठी नामांकित आहेत.

येत्या 11 मे रोजी मुंबईतील कमालिस्तान स्टुडिओत संस्कृती कलादर्पण पुरस्कार पार पडणार आहे. यंदा ही सोनेरी रंगाची झळाळती ट्रॉफी नक्की कुणाच्या हातात दिसते त्याचा उलगडा त्याच दिवशी होईल.

Body:.

Conclusion:.
Last Updated : Apr 28, 2019, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.