अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केला आणि पाहता पाहता प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे.
तेजश्रीची शुभ्रा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. जशास तसं वागणारी आणि वेळ प्रसंगी आपल्या सासूबाईंच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी शुभ्रा ही प्रेक्षकांच्या घरातीलच एक व्यक्ती बनली आहे. आता मकरसंक्रांतीचा सण येतोय आणि सोहम व शुभ्राची ही लग्नानंतरची पहिलीच संक्रांत असल्यामुळे आसावरी शुभ्राचे सगळे लाड पुरवणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मालिकेत कुलकर्णी कुटुंब हा सण दणक्यात साजरा करणार आहेत. पहिली संक्रात साजरी करण्यासाठी शुभ्रा हलव्याचे दागिने घालून नटलेली प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हलव्याच्या दागिन्यांमुळे तेजश्रीचं सौंदर्य अगदी खुलून आलंय. इतकंच नव्हे तर ते सर्व मिळून पतंग देखील उडवणार आहेत. 'अग्गंबाई सासूबाई' सेटवरील मकर संक्रांतीची ही काही खास क्षणचित्रं. शुभ्राचा पहिला संक्रांत सण प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">