ETV Bharat / sitara

‘राजा’ आणि ‘रानी’ ‘जोडी’ने खेळणार होळी! - होळी

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये होळी-रंगपंचमी रंगणार आहे. मालिकेमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. संजु-रणजीत आणि संपूर्ण ढाले पाटील परिवार हा सण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे.

राजा राणीची होळी
राजा राणीची होळी
author img

By

Published : Mar 26, 2021, 4:09 PM IST

होलिकोत्सव जवळ आला की मालिकांमध्ये होळी-रंगपंचमीच्या भागांची रेलचेल दिसते. रंगपंचमीच्या दिवशी सगळी लोकं त्यांच्यातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग रोष विसरून जातात. तर होळीला वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय होतो असे म्हटलं जाते. कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'राजा रानीची गं जोडी' मालिकेमध्ये रणजीत संजीवनी होळी-रंगपंचमी रंगणार आहे. मालिकेमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. संजु-रणजीत आणि संपूर्ण ढाले पाटील परिवार हा सण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे.

राजा राणीची होळी
राजा राणीची होळी

हेही वाचा - 'रँचो'नंतर 'व्हायरस'ने 'फरहानला'ही गाठले, आर माधवन 'थ्री इडियट्स'चा संदर्भ देत खुलासा

संजुचं PSI होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवस रात्र मेहनत करत आहे, आणि आता तर तिला रणजीतची खंबीर साथ देखील मिळाली आहे. पंजाबरावांनी रणजीतला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. रणजीत कडून पुण्यामध्ये घडलेल्या चूकीबद्दल त्यांना माहीती आहे, असे सांगून ते रणजीतला धमकावत आहेत. संजु आणि रणजीतच्या नात्यामध्ये आलेली कटुता आता हळूहळू दूर होऊ लागली आहे. पण अजूनही रणजीतने संजुला त्याच्याकडून झालेल्या चुकीबद्दल सांगितले नाहीये. खरंतर संजू आणि रणजीतच्या नात्यावरच संकट अजूनही टळलं नाहीये. संजूला राजश्रीच्या खेळींनाही समोर जायचंय. होलिका देवीला संजू आणि रणजीतचे हेच मागणे असणार येणारी सगळी संकट यांचे दहन होऊन जाऊ दे, अशीच ती प्रार्थना करत आहे. नंतर ते रंगपंचमी खेळताना दिसतील.

राजा राणीची होळी
राजा राणीची होळी

हेही वाचा - राजकारणात उतरणार का? पाहा यावर काय म्हणाली कंगना..!!

‘राजा रानीची गं जोडी’ होळी विशेष भाग येत्या शुक्रवार आणि शनिवार संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.