ETV Bharat / sitara

शब्दांपलिकडचं अबोल नातं उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

विजय डोब्रियाल हा या चित्रपटात वडिलांची भूमिका साकारत आहे. तर, आर्यन हा त्याचा मुलगा 'शंकर'ची भूमिका साकारत आहे. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये चित्रपटाचा सार पाहायला मिळतो.

शब्दांपलिकडचं अबोल नातं उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शन
author img

By

Published : Jul 16, 2019, 6:04 PM IST

Updated : Jul 16, 2019, 7:01 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची निर्मिती असलेल्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून संजय दत्त मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. त्याची निर्मिती असलेल्या या चित्रपटात वडील आणि मुलाचं भावनिक विश्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता दीपक डोब्रियाल हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर आणि बालकलाकार आर्यन मेघाजी यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका राहणार आहेत.

Sanjay dutt production marathi film Baba trailer release
'बाबा' चित्रपटाचे पोस्टर

विजय डोब्रियाल हा या चित्रपटात वडिलांची भूमिका साकारत आहे. तर, आर्यन हा त्याचा मुलगा 'शंकर'ची भूमिका साकारत आहे. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये चित्रपटाचा सार पाहायला मिळतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

शंकरच्या पालकत्वासाठी गरीब कुटुंब कशाप्रकारे लढा देतो, हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे शंकरचा साभाळ करणारे आईवडील हे मुकबधीर दाखवले आहेत. त्यामुळे त्याच्यावर हक्क गाजवणारे दुसरे आईवडील त्याला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी गावात जात असतात. त्यामुळे शंकरचे खरे आईवडील कोण आहेत? त्याचा हक्क कोणाला मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातूनच उलगडण्यात येतील.

संजय दत्तने त्याचा हा पहिलाच चित्रपट त्याच्या वडिलांना समर्पित केला आहे. दिग्दर्शक राज आर. गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 16, 2019, 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.