ETV Bharat / sitara

आईच्या पावलावर पाऊल टाकत शर्वरी कुलकर्णी आलीय अभिनय क्षेत्रात! - संपदा कुलकर्णीची मुलगी शर्वरी अभिनय क्षेत्रात

संपदा कुलकर्णी (जोगळेकर) या मराठी चित्रपट मालिका तसेच नाटकात एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी शर्वरी ही देखील अभिनय क्षेत्रात आपला जम बसवू पाहत आहे.

संपदा कुलकर्णीची मुलगी शर्वरी अभिनय क्षेत्रात

author img

By

Published : Dec 18, 2021, 7:28 PM IST

मराठीत तरी नेपोटिझम बद्दल बोललं जात नाहीये. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांची मुलं-मुली आपल्या फेमस पालकांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसताहेत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत एक अभिनेत्री काम करतेय जिची आईदेखील प्रथितयश अभिनेत्री आहे. या मालिकेतील ‘शलाका’ हे पात्र रंगवतेय शर्वरी कुलकर्णी ही अभिनेत्री. जेष्ठ अभिनेत्री संपदा (जोगळेकर) कुलकर्णी ही तिची आई आहे. संपदा कुलकर्णी या मराठी चित्रपट मालिका तसेच नाटकात एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी शर्वरी ही देखील अभिनय क्षेत्रात आपला जम बसवू पाहत आहे.

संपदा कुलकर्णीची मुलगी शर्वरी अभिनय क्षेत्रात
संपदा कुलकर्णीची मुलगी शर्वरी अभिनय क्षेत्रात

झी मराठी वाहिनीवरील “मन उडू उडू झालं” ही नवी मालिका प्रेक्षकांना आवडतेय, हे प्रेक्षकांच्या मालिकेला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादावरून कळतंय. या मालिकेतील सगळ्याच भूमिका या अतिशय दर्जेदार रित्या झालेल्या आहेत. मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे ही दिपूची भूमिका साकारत असून अभिनेता अजिंक्य राऊत इन्द्रा ही भूमिका साकारतोय. मालिकेत देशपांडे कुटुंबात शलाका, सानिका आणि दीपिका या तीन मुली आहेत. लवकरच शलाका ही लग्न करून अमेरिकेला जाणार असल्याने देशपांडे कुटुंबात तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. मालिकेत शलाका हि खूप साधी भोळी आणि हळवी आहे ज्यात शर्वरी कुलकर्णी ती भूमिका साकारताना दिसतेय.

प्रेक्षकवर्ग कधी कधी खूप उत्सुक असतो जाणून घेण्यासाठी की उत्तम अभिनय करणारी नायिका वा अभिनेत्री ही कुणा एखाद्या प्रख्यात अभिनेता किंवा अभिनेत्रीची तर मुलगी नसेल ना? तर अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी साठी प्रेक्षकांना पडलेल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की शर्वरी कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांची मुलगी आहे. “मन उडू उडू झालं” या मालिकेतील शलाका या भूमिकेसाठी शर्वरी हिने मेहनत घेतली असून तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडतेय.

‘मन उडू उडू झालं’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारीत होते.

हेही वाचा - 'अतरंगी रे' रिलीजपूर्वी सारा अली खानचे सत्यात उतरले स्वप्न

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.