ETV Bharat / sitara

‘समांतर-२’ने स्वप्नील जोशीला दिले प्रेम आणि समाधान... - samantar 2

पहिल्या पर्वाला अतुलनीय असे यश मिळाल्यानंतर आणि प्रेक्षकांकडून विक्रमी हिट्स प्राप्त झाल्यानंतर ‘समांतर-२’ या मराठी वेब सिरीजचा दुसरा सिझन दाखल झाला आहे. या दुसऱ्या पर्वामध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये प्रेक्षकांसाठी दाखल केली गेली आहेत. सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज बेतली आहे.

समांतर’
समांतर’
author img

By

Published : Jul 3, 2021, 11:52 AM IST

Updated : Jul 5, 2021, 1:20 PM IST

मुंबई - ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार यांची निर्मिती असलेल्या, सतीश राजवाडे दिग्दर्शित, ‘समांतर’ च्या दुसऱ्या सिझनचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे. ‘एमएक्स प्लेयर’वर त्याचे प्रक्षेपण सुरू झाले असून त्याला प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा मिळतोय. नितीश भारद्वाज आणि स्वप्नील जोशी, तेजस्वीनी पंडित यांनी या मालिकेमध्ये दर्जेदार रंग भरले आहेत. तसेच मालिकेच्या दुसऱ्या पर्वात सई ताम्हणकर आल्याने या मालिकेमध्ये वेगळीच जान आणि ग्लॅमर प्राप्त झाले आहे.

swapnil joshi
swapnil joshi
पहिल्या पर्वाला अतुलनीय असे यश मिळाल्यानंतर आणि प्रेक्षकांकडून विक्रमी हिट्स प्राप्त झाल्यानंतर ‘समांतर-२’ या मराठी वेब सिरीजचा दुसरा सिझन दाखल झाला आहे. या दुसऱ्या पर्वामध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये प्रेक्षकांसाठी दाखल केली गेली आहेत. सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज बेतली आहे. यातील कुमार महाजनला एके दिवशी कळते की त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी आधीच जागून गेला आहे. तो मग त्याच्या भविष्यामध्ये काय लिहिले आहे, याचा शोध घेऊ लागतो. दुसऱ्या पर्वामध्ये नितीश भारद्वाज आणखी एका प्रमुख भूमिकेमध्ये आहे.‘समांतर-२’मधील भूमिकेबद्दल बोलताना स्वप्निल जोशी म्हणाला, “माझ्या इमेजमधून बाहेर पडण्याचा हा माझा प्रयत्न आहे. हा माझ्या कारकीर्दीचा उत्तम असा टप्पा आहे. मला स्वतःलाच आव्हान द्यायचे आहे. मला ‘समांतर’सारख्या गोष्टी करायच्या आहेत. मला ‘समांतर’ने जे प्रेम आणि आदर दिला आहे तो मला वाटते दहा रोमॅन्टीक चित्रपटांनीही दिला नसता.”
समांतर २ची टीम
समांतर २ची टीम
दिग्दर्शक समीर विद्वांस म्हणाले, “समांतर’ ही एक नाट्यमय मालिका असून या संपूर्ण सीझनमध्ये रहस्यमय आणि गूढ घटना घडत राहतात. ही मालिका सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या दर्जेदार कथानक असलेल्या कादंबरीवर बेतली आहे. मूळ मराठी भाषेतील ही वेब मालिका नंतर हिंदी, तेलगु तसेच तमिळ या भाषांमध्ये भाषांतरित झाली. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, मालिकेचा दुसरा सिझन हा पहिल्यापेक्षाही उत्तम असेल. मला ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांचे त्यांनी आम्हाला या मालिकेच्या संकल्पना तसेच तिच्या निर्मितीच्या टप्प्यांवर जे स्वातंत्र्य दिले त्यासाठी आभार मानायचे आहेत.” “पहिल्या मोसमामध्ये आम्ही अतुलनीय असे यश कमावले आहे. दुसऱ्या सिझनमध्ये आम्ही अधिक मोठी कलाकारांची फळी घेवून आलो आहोत. आम्ही वैविध्यपूर्ण अशा विषयांवर आणखीही अशा मालिका भविष्यात बनविणार आहोत,” असे उदगार ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी काढले. या वेब सिरीजची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या जीसिम्स (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अंड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड) या आघाडीच्या कॉन्टेंट निर्मिती कंपनीने केली आहे. ‘समांतर’च्या पहिल्या पर्वाला तब्बल २०० दशलक्ष प्रेक्षकसंख्या मिळाली आणि पुरस्कारही मिळाले ज्यात ‘सर्वोत्तम प्रादेशिक वेब सिरीज मालिका’ पुरस्काराचा समावेश आहे.

हेही वाचा - धकधक गर्ल OTT वर: माधुरी दीक्षित झळकणार 'मेरे पास माँ है'मध्ये

Last Updated : Jul 5, 2021, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.