ETV Bharat / sitara

‘समांतर-२’ला साडेपाच कोटींपेक्षा जास्त प्रेक्षकांचा प्रतिसाद!

स्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, तेजस्विनी पंडीत आणि सई ताम्हणकर यांच्या अभिनयाने नटलेल्या ‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद मिळतो आहे. ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांची निर्मिती असलेल्या या वेब सिरीजला साडेपाच कोटींपेक्षा जास्त प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालाय, तोही दोन आठवड्यात, आणि प्रत्येक दिवशी त्यात झपाट्याने वाढच होतेय.

‘समांतर-२
‘समांतर-२
author img

By

Published : Jul 18, 2021, 6:52 AM IST

मुंबई - स्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, तेजस्विनी पंडीत आणि सई ताम्हणकर यांच्या अभिनयाने नटलेल्या ‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद मिळतो आहे. ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांची निर्मिती असलेल्या या वेब सिरीजला साडेपाच कोटींपेक्षा जास्त प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालाय, तोही दोन आठवड्यात, आणि प्रत्येक दिवशी त्यात झपाट्याने वाढच होतेय. पहिल्या सिझनला जो प्रतिसाद मिळाला त्याची पुनरुक्ती करत ‘समांतर’च्या दुसऱ्या सिझनलासुद्धा प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

‘समांतर-२’
‘समांतर-२’
स्वप्नील जोशी या मालिकेत कुमार महाजन या प्रमुख व्यक्तिरेखेच्या भूमिकेत आहे. तो म्हणाला की, “मला आनंद आहे की मी माझ्या करियरमध्ये जे नवीन प्रयोग करत आहे त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सर्व यशाचे श्रेय खासकरून निर्माते अर्जुन आणि कार्तिक यांना तसेच दिग्दर्शक समीर विद्वांस यांना आहे. त्यांनी सर्जनशिलतेच्या बाबतीत जे श्रम घेतले आणि चित्रीकरणाच्या बाबतीत जो दर्जा सांभाळला त्याला तोड नाही, ‘समांतर-२’ ला सुद्धा यश मिळणार याबाबत आम्हाला खात्री होती, कारण यातील सर्वच गोष्टी अचूकपणे जुळून आल्या आहेत. दुसऱ्या भागाला जो प्रतिसाद मिळतो आहे, त्याने मला खूप आनंद झाला आहे.”

स्वप्नीलने सांगितल्या समांतरच्या गोष्टी
पहिल्या सिझनच्यावेळी ‘समांतर’ची संपूर्ण टीम कोल्हापूर येथे आलेल्या पुरामध्ये १३ दिवस अडकून पडली होती. “आम्ही ‘समांतर-१’ चे चित्रिकरण कोल्हापूर येथे करत होतो. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात ऑगस्ट २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. संपूर्ण जिल्हे जलमय झाले होते. या पुराचा कहर एवढा मोठा होता की संपूर्ण चमू तब्बल १३ दिवस एका हॉटेलमध्ये अडकून पडला होता. आज चित्रिकरणादरम्यान जेव्हा कधी त्या दिवसांची आठवण होते, तेव्हा अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो.”

‘समांतर-२’बद्दल आमच्याशी गप्पा मारताना अर्जुन आणि कार्तिक म्हणाले, “समांतर’ची कथाच खूप सुरेख आहे आणि ती मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना आवडेल याबाबत आम्हाला खात्री होती. ‘समांतर-२’ला जो प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. आम्हाला विविध विषय व प्रकारांवर आधारित अशा आणखीही वेब सिरीजची निर्मिती करायची आहे. आम्ही जेव्हा सई ताम्हणकरची सुंदरा व मिराच्या व्यक्तिरेखांसाठी निवड केली तेव्हा अनेक नावे आम्हाला सुचवली गेली होती. परंतु आम्ही सईच्या नावावर ठाम होतो. आम्हाला माहित होते की, सुंदराच्या व्यक्तिरेखेला केवळ तीच न्याय देऊ शकेल.”

स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज यांना दोन वेगळ्या मालिकांमध्ये केलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी ओळखले जाते. ‘समांतर’ च्या माध्यमातून या दोन प्रतिभावान कलाकारांना समोरासमोर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे.

हेही वाचा - Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईतील रस्ते जलमय; अनेक घरात घुसले पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.