ETV Bharat / sitara

वाळू शिल्प बनवून महाराष्ट्र पोलिसांना सलाम - आदेश बांदेकर

मुंबई व महाराष्ट्र पोलीस यांच्या तत्परतेची आणि शौर्याची कथा नवे लक्ष्य या टीव्ही मालिकेत दाखवण्यात येणार आहे. जूहू चौपाटीवर वाळूचे एक शिल्प बनवून मालिकेतील कलाकार व निर्मात्यांनी पोलिसांना अनोखा सलाम केला आहे.

maharashtra-police-
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
author img

By

Published : Mar 1, 2021, 5:08 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी मुंबई पोलीस तसेच महाराष्ट्र पोलीस अतिशय चोख पद्धतीने नेहमीच बजावत असतात. म्हणूनच त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी व त्यांचे शौर्य संपूर्ण महाराष्ट्र, तसेच जगभरात समोर आणण्यासाठी स्टार प्रवाह नवीन मालिका घेऊन येत आहे. या मालिकेचे नाव आहे 'नवे लक्ष्य'. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ७ मार्चपासून.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

या मालिकेच्या प्रमोशनसाठी टीमने अतिशय सुबक असे वाळू शिल्प काढून महाराष्ट्र पोलीस तसेच मुंबई पोलिसांना एक अनोखा सलाम दिला आहे.

जुहू चौपाटी जवळ झालेला एका कार्यक्रमात हे वाळूचे शिल्प साकारले गेले. या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सोबत पोलीस दलातील अन्य सहकारी, तसेच 'नवे लक्ष्य' मालिकेतील सर्व कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा - जॅकलिन फर्नांडिज आणि अक्षय कुमार यांच्यात काय साम्य आहे?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.