ETV Bharat / sitara

सलमानचा ऑनस्क्रिन मुलगा झळकणार बिग बॉसमध्ये - बिग बॉस

बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. 'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटात त्याने सलमानच्या मुलाची भूमिका साकारली होती. त्यामुळे सलमानचा ऑनस्क्रिन मुलगा बिग बॉसमध्ये झळकणार याची चर्चा सध्या जोरात आहे.

सलमान खान
author img

By

Published : Aug 3, 2019, 3:49 PM IST

बिग बॉसच्या १३ व्या पर्वाला सुरूवात होण्यास आता काही दिवस उरले आहेत. अलिकडेच या पर्वात एका नव्या चेहऱ्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. चंकी पांडेनंतर आता बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणदेखील बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे.

बिग बॉच्या वतीने याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी शोच्या निर्मात्याकडून आदित्य नारायणशी चर्चा सुरू आहे. यावेळी मुग्धा गोडसे आणि माहिका शर्मा यांचीही बिग बॉसमध्ये एन्ट्री होणार आहे.

'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटात आदित्य नारायणने सलमानच्या मुलाची भूमिका साकारली होती. त्यामुळे सलमानचा ऑनस्क्रिन मुलगा बिग बॉसमध्ये झळकणार याची चर्चा सध्या जोरात आहे.

बिग बॉसचे १३ वे पर्व २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याचा स्टुडिओ मुंबईत गोरेगावला उभारला जात आहे. सलमानसोबत कॅटरिना कैफ या शोमध्ये अँकरींग करणार असल्याचेही चर्चा आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.