मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा पुढच्या वर्षी 'ईद'च्या मुहूर्तावर 'राधे' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पटाणीचीही वर्णी लागली आहे. चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात झाली आहे. सलमान खानने शूटिंगच्या पहिल्या दिवशीच 'राधे'च्या रुपात धमाकेदार एन्ट्री केली आहे. त्याने एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सलमान खानने शूटिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या अनोख्या स्वॅगमध्ये एन्ट्री घेतली. त्यामुळे या चित्रपटातही भाईजानचा खास अवतार पाहायला मिळणार, याचा अंदाज बांधता येतो.
-
#RadheEid2020 . . . Day 1 pic.twitter.com/o9GLYTjMtt
— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) November 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#RadheEid2020 . . . Day 1 pic.twitter.com/o9GLYTjMtt
— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) November 4, 2019#RadheEid2020 . . . Day 1 pic.twitter.com/o9GLYTjMtt
— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) November 4, 2019
हेही वाचा -IFFI 2019: महानायकासोबत रजनीकांत करणार 'ईफ्फी'ची सुरूवात
या चित्रपटात सलमान खानसोबत रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ यांचीही महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहेत. प्रभूदेवासोबत सलमान खानचा हा तिसरा चित्रपट आहे.
सलमान खानचा 'दबंग ३' हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा - 'भारत'नंतर दिशा पटाणीची पुन्हा सलमानसोबत वर्णी, या चित्रपटात झळकणार एकत्र