नववर्षाचं सेलिब्रेशन करताना स्टार प्रवाह घेऊन येताहेत ‘धुमधडाका २०२२’. या कार्यक्रमात ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘संजना’ ची ठसकेबाज लावणी पाहायला मिळणार आहे. संजनाच्या दिलखेचक अदांनी स्टार प्रवाहची नवीन वर्षाची पार्टी रंगणार आहे. धमाल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता येणार असून या सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार आहे. सरत्या वर्षाला हसरा निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
स्टार प्रवाह धुमधडाका २०२२ या नववर्ष विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. या खास कार्यक्रमात आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेत रुपाली भोसलेच्या दिलखेचक अदांनी नवीन वर्षाची पार्टी रंगणार आहे. संजनाने ठसकेबाज लावणी सादर करत या कार्यक्रमात रंगत आणली आहे. संजनाचा ग्लॅमरस अंदाज मालिकेतून पाहायलाच मिळतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमातील तिचा मराठमोळा ठसकाही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
‘स्टार प्रवाह धुमधडाका २०२२’ हा नववर्ष स्वागत कार्यक्रम रविवार २ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - SRK Plan For Aryan Future : आर्यनच्या करियरसाठी शाहरुख खानने बनवला परफेक्ट प्लॅन