ETV Bharat / sitara

रोहित शेट्टी आणि फरहान अख़्तर यांच्या ‘मिशन फ्रंटलाईन’मधील खडतर प्रशिक्षणाची झलक! - Mission Frontline based on the Armed Forces

सशस्त्र दलांवर आधारित प्रसिद्ध मालिकांमधील ओरिजिनल मालिकांचे सादरीकरण डिस्कव्हरी+ वर होणार असून यातून रोहित शेट्टी आणि फरहान अख़्तर यांच्या ‘मिशन फ्रंटलाईन’ मधील खडतर प्रशिक्षणाची झलक दिसणार आहे. डिस्कव्हरी+ मध्ये ‘होम ऑफ पॅट्रिएट्स’ सर्वोत्तम देशभक्तीचे कंटेंट बघायला मिळेल. त्यामध्ये मिशन फ्रंटलाईन, लडाख वॉरीयर्स, ब्रेकिंग पॉईंट, स्पेशल ऑपरेशन्स इंडीया व इतर अनेक शीर्षकांचा समावेश असेल.

मिशन फ्रंटलाईन
मिशन फ्रंटलाईन
author img

By

Published : Jan 18, 2022, 11:59 AM IST

मुंबई - सशस्त्र दलांवर आधारित प्रसिद्ध मालिकांमधील ओरिजिनल मालिकांचे सादरीकरण डिस्कव्हरी+ वर होणार असून यातून रोहित शेट्टी आणि फरहान अख़्तर यांच्या ‘मिशन फ्रंटलाईन’ मधील खडतर प्रशिक्षणाची झलक दिसणार आहे. डिस्कव्हरी+ मध्ये ‘होम ऑफ पॅट्रिएट्स’ सर्वोत्तम देशभक्तीचे कंटेंट बघायला मिळेल. त्यामध्ये मिशन फ्रंटलाईन, लडाख वॉरीयर्स, ब्रेकिंग पॉईंट, स्पेशल ऑपरेशन्स इंडीया व इतर अनेक शीर्षकांचा समावेश असेल.

राणा दग्गुबती आणि सारा अली खान ह्यांच्या मिशन फ्रंटलानमधील समावेशाला मिळालेल्या उल्लेखनीय प्रतिसादानंतर या साहसाने भरलेल्या भागांमध्ये फरहान अख़्तर आणि रोहीत शेट्टी असतील व ते साहस, सहनशक्ती, कठोर प्रशिक्षण, अतिशय कष्टाने मिळवलेली पात्रता आणि पॉवरफुल व्हिज्युअल्ससह प्रत्येक भाग भारताच्या योद्ध्यांच्या जीवनाची एक झलक प्रेक्षकांसमोर आणतील.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या अभियानाअंतर्गत मिशन फ्रंटलाईन मध्ये फरहान अख़्तर जम्मू- कश्मीरच्या राष्ट्रीय रायफल सैनिकांसोबत खडतर प्रशिक्षण धेईल तर रोहीत शेट्टी श्रीनगरच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रूपचे पोलिस अधिकारी यांच्यासह साहसी कृत्ये करताना दिसतील. अभिनेता, लेखक, निर्माता व सादरकर्ता फरहान अख़्तर व प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता रोहीत शेट्टी हे या ‘मिशन फ्रंटलाईन’चा भाग असतील.

मिशन फ्रंटलाईन
मिशन फ्रंटलाईन

फरहान अख़्तर म्हणाला, “माझ्या भावना एका शब्दामध्ये व्यक्त करणे मला अशक्य आहे. आम्ही जेव्हा लक्ष्यचे शूटींग करत होतो, तेव्हा आम्ही आपल्या जवानांचं व्यक्तिगत जीवन अगदी जवळून बघू शकलो होतो. परंतु त्यांच्या जागी जाऊन राहणे आणि प्रत्यक्ष त्यांच्या समोर असलेल्या कठीण परिस्थितीला सामोरे जाणे, हा जीवन बदलणारा अनुभव होता. अशा प्रतिकूल प्रदेशामध्ये व विपरित स्थितीमध्ये प्रशिक्षण प्राप्त करणे, हे माझ्यासाठी अतिशय कठीण होते, परंतु त्यांचे सहाय्य आणि प्रोत्साहन यामुळे ते शक्य बनले.”

मिशन फ्रंटलाईन
मिशन फ्रंटलाईन

रोहीत शेट्टी म्हणाला, “मी माझा अनुभव शब्दांमध्ये सांगू शकत नाहीये. लोक नेहमीच मला साहसासोबत जोडतात, परंतु ‘खरे साहस’ इथे आहे. यांच्या अतिशय तणावाच्या जागेला लक्षात घेता दररोज सकाळी ड्युटीवर जाणे व परत येईपर्यंत सुरक्षित असू अशी आशा कुटुंबासाठी बाळगणे, हे अतिशय हिमतीचे काम आहे. त्यांच्या अदम्य उत्साहाने मी थक्क झालो. पोलिसाच्या जीवनाच्या या पैलूंचे दर्शन मला इथे आणून घडवल्याबद्दल डिस्कव्हरी+ ला धन्यवाद. ह्यामुळे प्रेक्षकही थक्क होतील आणि त्यांनाही त्यांच्या उत्साहाला व देश व नगरिकांबद्दलच्या त्यांच्या भावनेला सॅल्यूट करावासा वाटेल.”

डिस्कव्हरी इन्क, साउथ एशियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर मेघा टाटा म्हणाल्या, “आमच्या होम ऑफ पॅट्रिऑटस् कंटेंटसह आपल्या सैनिकांना व जवानांना सॅल्यूट करण्याचा व आपला आदर व्यक्त करण्याचा हा उत्तम क्षण आहे. फरहान अख़्तर आणि रोहीत शेट्टी अशा देशातील लक्षणीय व्यक्तींना ह्यामध्ये एका दिवसासाठी सैनिक आणि पोलिस अधिका-यांच्या स्वरूपामध्ये सहभागी करणे विशेष ठरले व त्यामुळे प्रेक्षकांसाठी त्यांना बघणे थरारक ठरेल.”

सैनिकांचे रुपांतर भारतीय सेनेच्या उज्ज्वल योद्ध्यांमध्ये कसे होते, हे ह्या मालिकेद्वारे दर्शकांना बघता येईल. फरहान अख़्तर आणि रोहीत शेट्टी ह्यांचा सहभाग असलेले मिशन फ्रंटलाईन २० जानेवारी रोजी व ब्रेकिंग पॉईंटच्या ४ विशेष डॉक्युमेंटरीज २१ जानेवारी रोजी डिस्कव्हरी+ वर प्रदर्शित होणार आहेत.

हेही वाचा - Dhanush Aishwaryaa Rajinikanth Separated : 'थलाईवा’ रजनीकांतचा जावई धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.