मुंबई - ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा गेल्या काही दिवसापासून बातम्यांच्या मथळ्यांमध्ये झळकतोय. अलिकडेच त्याचा लखनौमध्ये त्याचा सत्कार पार पडला. त्यावेळी लाखो युवक त्याची एक झलक पाहण्यासाठी कार्यक्रमाला पोहोचले होते. अशातच आता नीरज चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये मुली त्याच्या समोर नाचत आहेत.
खरंतर, भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा एका एफएम वाहिनीला व्हर्च्युअल मुलाखत देत होता. या दरम्यान, एफएम चॅनेलमध्ये उपस्थित मुलींनी 'उडे जब-जब जुल्फें तेरी ....' या गाण्यावर त्याच्यासमोर नृत्य केले. नीरज अक्षरशः डान्स बघत होता. नंतर, जेव्हा त्याला विचारण्यात आले की खूप छेडले का? त्यावर लाजत तो, ''थँक यू म्हणाला.''
-
Ladiesssss..Yes I got the hard hitting, deep answers too but..Take the first 4 secs before the cam moves to the zoom call to guess who we are dancing for😇 ;) #udejabjabzulfeinteri and then tell me I did it for all of us😄 #gold #olympics #neerajchopra @RedFMIndia @RedFM_Mumbai pic.twitter.com/SnEJ99MK31
— Mumbai Ki Rani (@mymalishka) August 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ladiesssss..Yes I got the hard hitting, deep answers too but..Take the first 4 secs before the cam moves to the zoom call to guess who we are dancing for😇 ;) #udejabjabzulfeinteri and then tell me I did it for all of us😄 #gold #olympics #neerajchopra @RedFMIndia @RedFM_Mumbai pic.twitter.com/SnEJ99MK31
— Mumbai Ki Rani (@mymalishka) August 19, 2021Ladiesssss..Yes I got the hard hitting, deep answers too but..Take the first 4 secs before the cam moves to the zoom call to guess who we are dancing for😇 ;) #udejabjabzulfeinteri and then tell me I did it for all of us😄 #gold #olympics #neerajchopra @RedFMIndia @RedFM_Mumbai pic.twitter.com/SnEJ99MK31
— Mumbai Ki Rani (@mymalishka) August 19, 2021
यापूर्वी गोल्डन बॉय नीरज चोप्राला एका मुलाखतीत लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते तेव्हा तो म्हणाला, ''सध्या माझे संपूर्ण लक्ष फक्त खेळांवर आहे.'' महिला चाहत्यांकडून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल नीरज म्हणाला, ''मला आनंद आहे की मला प्रत्येकाकडून इतके प्रेम मिळत आहे.''
गर्लफ्रेंडबद्दल विचारण्यात आला होता प्रश्न
'त्याच्यावर लग्न करण्याचा दबाव आहे का?' या प्रश्नाला उत्तर देताना नीरज म्हणाला, ''नाही, सध्या माझे संपूर्ण लक्ष खेळावर आहे. या सर्व गोष्टी चालू राहतील. पण सध्या मला फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे.'' नीरजला जेव्हा त्याची गर्लफ्रेंड आहे का असे विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, "या क्षणी कोणीही नाही.''
घरच्यांच्या मर्जीने करायचे आहे लग्न
लव्ह मॅरेज किंवा अरेंज्ड मॅरेज करण्याच्या प्रश्नावर नीरज म्हणाला की, ''कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या मर्जीने लग्न करायचे असेल किंवा मला प्रेम विवाह करायचा असेल तर काही हरकत नाही.'' नीरजने सांगितले की जर त्याला एखादी मुलगी आवडली तर तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलून लग्न करेल.
हेही वाचा - शाहरुखची मुलगी सुहाना किशोरवयीन रोमँटिक ड्रामामधून करणार पदार्पण?