ETV Bharat / sitara

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर रितेश आणि जिनेलिया देशमुखचा खळखळाट

‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya )कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतोय. आता पुन्हा एकदा रितेश देशमुख ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हजेरी लावणार असून त्याच्यासोबत त्याची अर्धांगिनी जिनेलिया सुद्धा असणार आहे. थुकरट वाडीत येऊन रितेशने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

चला हवा येऊ द्यामध्ये रितेश देशमुखआणि जिनेलिया

author img

By

Published : Nov 22, 2021, 4:27 PM IST

साधारण सातेक वर्षांपूर्वी रितेश देशमुख ने ‘लई भारी’ मधून मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण (Riteish Deshmukh's Marathi debut in 'Lai Bhari')केले आणि त्या चित्रपटाचे मराठीत प्रोमोशन करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya comedy show) हा कार्यक्रम जन्माला आला. सुरुवातीला एक एपिसोड म्हणून हा कार्यक्रम संकल्पित करण्यात आला होता परंतु प्रेक्षकांकडून त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून तो सुरु ठेवला गेला आणि तो कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतोय. आता पुन्हा एकदा रितेश देशमुख ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हजेरी लावणार असून त्याच्यासोबत त्याची अर्धांगिनी जिनेलिया सुद्धा असणार आहे. थुकरट वाडीत येऊन रितेशने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

चला हवा येऊ द्यामध्ये रितेश देशमुखआणि जिनेलिया
चला हवा येऊ द्यामध्ये रितेश देशमुखआणि जिनेलिया

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hava Yeu Dya comedy show) हा छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. आठवड्याच्या सुरुवातीला रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. चला हवा येऊ द्या मध्ये मराठीच नाही तर बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. या आठवड्यात थुकरटवाडी सज्ज झालीय ‘लय भारी’ जोडीचे आदरातिथ्य करण्यासाठी.

येत्या आठवड्यात थुकरट वाडीत येणार आहे महाराष्ट्राचं लाडकं सेलेब्रिटी जोडपं रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh). चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची सुरुवात लयभारी या चित्रपटाच्या टीमसोबत झाली होती. त्यामुळे रितेश देशमुख हे चला हवा येऊ द्या च्या मंचावर हजेरी लावणारे सगळ्यात पहिले कलाकार आहेत. आता सात वर्षांनी रितेश या मंचावर लयभारी आणि माउली चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देणार असून त्यांच्या जोडीला जिनिलिया देखील असणार आहे. या दोघांच्या उपस्थितीत चला हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी कल्ला केला. लय भारी आणि माउली या चित्रपटांवर आधारित एक प्रहसन सादर केलं ज्याने रितेश आणि जिनेलियाला पोट धरून हसायला भाग पाडलं.

‘चला हवा येऊ द्या’ शो सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर प्रसारित होतो.

हेही वाचा - अभिनेत्री 'मनिषा केळकर'ने अपघातावर मात करत केलं बॉडी ट्रान्सफोरमेशन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.