मुंबई - हॉलिवूडचे ट्रिपल ऑस्कर विनिंग तसेच ट्रिपल बाफ्टा विनिंग एनिमेटर रिचर्ड विलियम्स यांचे शुक्रवारी (१६ ऑगस्ट) रोजी निधन झाले आहे. 'हु फ्रेम्ड रॉजर रॅबिट' या अॅनिमेशनपटासाठी ते ओळखले जात होते. विलियम्स हे अॅनिमेटरसोबतच दिग्दर्शक, निर्माते तसेच लेखक आणि शिक्षकही होते. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
रिचर्ड विलियम्स यांनी 'पिंक पँथर'चा टायटल सिक्वेंसचे देखील अॅनिमेशन केले होते. १९५८ साली त्यांचा पहिला अॅनिमेशनपट 'द लिटिल आईसलँड' हा होता. १९७१ साली त्यांनी 'ए क्रिस्मस कॅरोल'च्या अॅनिमेशनसाठी पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
'हु फ्रेम्ड रॉजर रॅबिट' हा अॅनिमेशनपट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. या चित्रपटला उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टसाठी ऑस्कर मिळाला होता.
१९९० साली रिचर्ड यांनी अॅनिमेशनचे प्रशिक्षणही देण्यास सुरुवात केली होती. 'डिझ्नी पिक्सर', 'आईएलएम', 'ड्रीमवर्क', 'पीडीआय' आणि 'वॉर्नर ब्रॉस' यांसारख्या स्टूडिओला मास्टर क्लासेसचे प्रशिक्षण दिले.
२००१ साली त्यांचे 'द एनिमेटर्स सरव्हायवल किट' हे पुस्तकही प्रकाशित झाले होते.