ETV Bharat / sitara

प्रसिद्ध व्यंगचित्रकार नारायण देबनाथ यांचे ९७ व्या वर्षी निधन - नारायण देबनाथ यांचे ९७ व्या वर्षी निधन

प्रसिद्ध बंगाली व्यंगचित्रकार, लेखक आणि चित्रकार नारायण देबनाथ यांचे मंगळवारी वयाच्या ९७ व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. डी. लिट मिळालेले ते भारतातील पहिले आणि एकमेव कॉमिक्स-कलाकार आहेत. देबनाथ यांना २०२१ मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीनेही सन्मानित करण्यात आले आहे.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार नारायण देबनाथ
प्रसिद्ध व्यंगचित्रकार नारायण देबनाथ
author img

By

Published : Jan 18, 2022, 8:01 PM IST

कोलकाता - प्रसिद्ध बंगाली व्यंगचित्रकार, लेखक आणि चित्रकार नारायण देबनाथ यांचे मंगळवारी सकाळी कोलकाता येथे निधन झाले. त्यांना तीन दिवस वेंटिलेशन सपोर्टमध्ये ठेवण्यात आले होते. नारायण देबनाथ (वय ९७) यांना गेल्या २५ दिवसांपासून कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वेंटिलेशन सपोर्टवर ठेवण्यात आले होते.

देबनाथ यांच्या प्रसिद्ध निर्मितीमध्ये हंडा भोडा, नॉनटे फोंटे आणि बतुल द ग्रेट यांचा समावेश आहे. नारायण देबनाथ यांनी फ्रीलान्सिंग कॉमिक्स कलाकार म्हणून सुरुवात केली. डी. लिट मिळालेले ते भारतातील पहिले आणि एकमेव कॉमिक्स-कलाकार आहेत. देबनाथ यांना २०२१ मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीनेही सन्मानित करण्यात आले आहे.

  • We were proud to bestow upon him Bengal’s highest award Banga Bibhusan in 2013. His passing away is certainly an immeasurable loss to the world of literary creativity and comics.
    My deepest condolences to his family, friends, readers and countless fans and followers.

    — Mamata Banerjee (@MamataOfficial) January 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नारायण देबनाथ यांना श्रद्धांजली वाहिली. "2013 मध्ये त्यांना बंगालचा सर्वोच्च पुरस्कार बंग बिभूषण प्रदान करताना आम्हाला अभिमान वाटत होता. त्यांचे निधन हे साहित्यिक सर्जनशीलता आणि कॉमिक्सच्या जगासाठी नक्कीच अपरिमित नुकसान आहे. त्यांचे कुटुंब, मित्र, वाचक आणि असंख्य चाहते आणि अनुयायांप्रती माझ्या मनापासून संवेदना," असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.

हेही वाचा - N D Patil : ज्येष्ठ विचारवंत एन डी पाटील अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.