सौंदर्यवती रेखाने बॉलिवूडमध्ये एक काळ प्रचंड गाजवला. ती सध्या चित्रपटांतून दिसत नसली तरी ती पुरस्कार सोहळे आणि रियालिटी शोजना हजेरी लावते. आताही तिने इंडियन आयडॉल १२च्या सेटवर पाहुणी सेलेब्रिटी म्हणून भेट दिली. यंदाच्या अप्रतिम स्पर्धकांमुळे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल १२ ला अपार लोकप्रियता मिळत आहे. या आठवड्यात भाग बॉलीवूड सुंदरी रेखाला समर्पित असणार आहे. आणि यात खुद्द मल्लिका-ए-इश्क रेखा या भागाची शोभा वाढवणार आहे.
रेखाकडून कांजीवरम साडीची भेट रेखाच्या कांजीवरम साड्या नेहमीच चर्चेत असतात.ती भारतीय पेहरावात सेटवर अवतरली आणि सेटवरील सगळ्या मुली, विशेषतः नेहा तिच्या रूपाने अगदी भारावून गेल्या. रेखाने सांगितले की, नेहाचे लग्न झाल्याने तिला खूप आनंद झाला आणि तिने नेहासाठी एक खास भेटवस्तू ‘शादी का शगुन’ म्हणून आणली होती. रेखाने लग्नानंतरच्या ओटी-भरण्याचा कार्यक्रम केला. नेहाला एक सुंदर कांजीवरम साडी भेट दिली. या सदाबहार अभिनेत्रीकडून मिळालेली ही सुंदर भेट पाहून नेहा धन्य झाली.
रेखाचे गौरवोद्गार
रेखा म्हणाली, “असे म्हणतात की, नवीन लग्न झालेल्या स्त्रीला पहिल्यांदा भेटताना तिला खूप आशीर्वाद द्यावेत. मला वाटते साडी हा एक अत्यंत सुंदर पोशाख आहे. म्हणून मी तिला साडीच द्यायचे ठरवले.” “मी रोहनला आधीच भेटले आहे, पण तू काही मला तुझ्या लग्नाला बोलावले नाहीस!” यावर नेहा उत्तरली, “जर मला हे माहीत असते की, तुम्ही मला ओळखता, तर मी नक्कीच तुम्हाला माझ्या लग्नाला बोलावले असते.”
रेखा ने नेहा कक्कर ची भरली ‘ओटी’ नेहा म्हणाली, “ही साडी म्हणजे आशीर्वाद आहे, जो मला रेखा मॅमकडून मिळाला आहे. ही साडी माझ्यासाठी नेहमीच खूप खास असेल. रेखाजी सगळ्यांनाच भारून टाकतात आणि मी देखील त्यातलीच एक आहे. त्यांना भेटणे आणि त्यांच्याकडून एक भेटवस्तू मिळणे हे माझ्यासाठी खूप विशेष आहे.हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.”इंडियन आयडॉल १२ दर शनिवारी आणि रविवारी रात्री ९.३० वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होईल. यावेळेस प्रेक्षकांना हा भाग पाहता येईल.