ETV Bharat / sitara

गुरूच्या दोन्ही शनाया येणार एकत्र, पाहा व्हिडिओ - song

'राधिका' आणि 'गुरूनाथ सुभेदार'सोबतच 'शनाया'च्या पात्राची प्रेक्षकांना भूरळ पडली होती. सुरुवातीला शनायाचे पात्र रसिका सुनील हिने साकारले होते. तर, आता हे पात्र अभिनेत्री ईशा केसकर ही साकारतेय.

गुरूच्या दोन्ही शनाया येणार एकत्र, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Jul 15, 2019, 9:32 PM IST

मुंबई - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून 'शनाया' हे पात्र घराघरात पोहचले. 'राधिका' आणि 'गुरूनाथ सुभेदार'सोबतच 'शनाया'च्या पात्राची प्रेक्षकांना भूरळ पडली होती. सुरुवातीला शनायाचे पात्र रसिका सुनील हिने साकारले होते. तर, आता हे पात्र अभिनेत्री ईशा केसकर ही साकारतेय. मात्र, आता या दोन्ही 'शनाया' पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत.

होय, ईशा केसकर आणि रसिका सुनील दोघीही पडद्यावर एकत्र भूमिका साकारताना दिसणार आहेत. मात्र, मालिकेत नव्हे, तर आगामी 'गर्लफ्रेन्ड' या चित्रपटात दोघींचीही वर्णी लागली आहे. अभिनेता अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची जोडी असलेला 'गर्लफ्रेन्ड' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
या ट्रेलरमध्ये अमेय वाघ हा 'गर्लफ्रेन्ड' पटवण्यासाठी काय काय करतो, हे पाहायला मिळते. ईशा आणि रसिकाची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. अमेय वाघ या चित्रपटात 'नचिकेत' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याचे अवघड असलेले सोपे कोडे सोडवण्यासाठी रसिका आणि ईशा त्याला मदत करताना दिसणार आहेत.

अलिकडेच या चित्रपटातील एका गाण्याचा टीजर ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 'कोडे सोपे थोडे अवघड थोडे पडले कारे, जागे होण्याआधी स्वप्न नव्याने घडले कारे', असे या गाण्याचे बोल आहेत. तर, 'थोडे सोपे, थोडे अवघड असे हे कोडे'!, असे कॅप्शन ईशाने या व्हिडिओवर दिले आहे. हे गाणे अमेय आणि सईवर चित्रित करण्यात आले आहे.

'गर्लफ्रेन्ड' या चित्रपटाच्या निमित्ताने दोन्हीही 'शनाया' आता पडद्यावर एकत्रीत पाहायला मिळणार म्हटल्यावर चाहत्यांनाही या चित्रपटाची उत्सुकता आहे. २६ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.