मुंबई - ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन असलेल्या भारतीय-अमेरिकन रॅपर आणि गीतकार राजा कुमारी यांनी 'शांती' हे पहिले हिंदी गाणे प्रसिद्ध केले आहे. 'शांती' हे गाणे इंग्रजी 'पीस' या ट्रॅकची हिंदी आवृत्ती आहे, जी मूळत: राजा कुमारी आणि त्यांचे सहकारी एल्विस ब्राउन यांनी लिहिली आहे. नवीन हिंदी आवृत्तीचे गाणे चरण यांनी लिहिले आहे.
रॅपर राजा कुमारी म्हणाल्या, "जेव्हा मी जुलै २०२० मध्ये 'पीस' हे गाणे पहिल्यांदा रिलीज केले तेव्हा मला हे गाणे वेगवेगळ्या व्हायब्रेशनमध्ये जगाने ऐकण्याची गरज आहे असे वाटले. हे गीत सकारात्मक लहरी आणि उर्जा निर्माण करण्यासाठी बनवले आहे."
त्या पुढे म्हणाल्या, “ 'पीस' ची हिंदी आवृत्ती शांती माझे पहिले हिंदी गाणे आहे. मी हे गीत माझी मातृभूमी आणि जगातील माझ्या चाहत्यांना समर्पित करते. आम्हाला हे गाणे बनवताना जितका आनंद झाला तितकाच आनंद तुम्हाला ऐकताना मिळेल अशी अपेक्षा आहे.''