मुंबई - सोशल मीडियावर एका रात्रीत आपल्या आवाजामुळे पश्चिम बंगालची महिला राणू मंडल प्रसिद्ध झाली. स्टेशनवरील तिचा गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अन् तिच्या आवाजाने सर्वांना भूरळ पाडली. हिमेश रेशमियानेही तिचा हा व्हिडिओ पाहिला. त्यालाही तिचा आवाज प्रचंड आवडला. त्याने तिला त्याच्या आगामी चित्रपटासाठी गाणं गाण्याची संधी दिली आहे.
होय, राणू मंडलचा एक व्हिडओ हिमेश रेशमियाने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हिमेशचा आगामी 'हॅप्पी, हार्डी अँड हीर' या चित्रपटासाठी हिमेशने राणूला गाण्याची संधी दिली आहे. तिच्या आवाजात असलेलं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिमेश रेशमियानेही तिला या गाण्यात साथ दिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या गाण्याचे रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. तर, हिमेशने दिलेल्या संधीमुळे राणू देखील आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, राणू 'सुपरस्टार सिंगर' या रिअॅलिटी कार्यक्रमातही सहभागी होणार आहे.
कोण आहे राणू मंडल -
राणू मंडल ही पश्चिम बंगाल येथील आहे. स्टेशनवर गाणं गाऊन ती पैसे मिळवत होती. काही दिवसांपूर्वीच तिचा स्टेशनवर गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. अनेकांनी तिच्या आवाजाला लतादिदींच्या आवाजाचीही उपमा दिली आहे. या व्हिडिओनंतर तिचे नशिब पालटले. आता तिच्याकडे बऱ्याच गाण्याच्या ऑफर्स येत आहेत.