राजा-रानीचे लग्न अनेक संकटांना तोंड देत अखेर निर्विघ्नपणे पार पडले. संजीवनीचा गृह प्रवेश झाला. एरव्ही बिनधास्त दिसणारी संजीवनी ढाले पाटलांच्या मोठ्या घरात कुसुमावती आणि इतर कुटुंबातील मंडळीसमोर थोडी बुजल्यासारखी वावरताना दिसते. पण रणजीतसोबत असताना तिचं वागण अगदी बिनधास्त असतं. नवे कुटुंब, नव्या जबाबदार्या, अपेक्षा या सगळ्यामध्ये संजीवनीला रणजीतची भक्कम साथ मिळाली आहे.
![raja_rani_sansar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-03-raja-rani-sansar-start-7206109_15022020011919_1502f_1581709759_495.jpg)
रणजीत आणि बेबी मावशीच्या साथीने संजीवनीला धीर मिळाला आहे. संजीवनी रणजीतचे नाते हळूहळू खुलू लागले आहे. लग्नानंतर घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे, आणि त्या निमित्ताने संजीवनीच्या माहेरच्या लोकांना देखील बोलावले आहे. ही पूजा व्यवस्थित पार पडत असतानाचं कुसुमावती संजीवनीच्या आईचा सगळ्यांसमोर अपमान करते. संजीवनी, रणजीत हा क्षण कसा सांभाळून घेतील? बेबी मावशी कसा संजीवनीला धीर देतील. हे प्रेक्षकांना महारविवारच्या विशेष भागामध्ये कळेल.
नवरा-बायकोचं नातं खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी संजीवनी आणि रणजीत देव दर्शनासाठी जाणार आहेत. प्रथेनुसार नवऱ्याने बायकोला उचलून पायऱ्या चढायच्या असतात. संजीवनी आणि रणजीतसाठी मात्र हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरणार आहे. देवाच्या आशीर्वादाने संजीवनी रणजीतच्या सुखी संसाराची सुरुवात होणार आणि या दोघांचं नातं खुलणार!
रविवारचा विशेष भाग कलर्स मराठीवर संध्या ७.०० वा. प्रसारित होईल.