ETV Bharat / sitara

शाळा महाविद्यालयात विद्यार्थीनींना स्वरक्षणाचे धडे देणं सक्तीचे करावे - राणी मुखर्जी

author img

By

Published : Dec 16, 2019, 4:30 PM IST

नाशिक पोलीस आयोजित 'महिलांवर अत्याचाराला नाही म्हणा' या परिसंवाद कार्यक्रमात राणीने हजेरी लावली होती. त्यावेळी ती बोलत होती.

Rani Mukerji on self defence education to students at Nashik
शाळा महाविद्यालयात विद्यार्थीनींना स्वरक्षणाचे धडे देणं सक्तीचे करावे - राणी मुखर्जी

नाशिक - देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थिनींना स्वराक्षणाचे धडे देणं सक्तीचे करावे, असे मत अभिनेत्री राणी मुखर्जीने व्यक्त केले आहे. नाशिक पोलीस दलाकडून आयोजित 'महिलांवर अत्याचाराला नाही म्हणा' या परिसंवाद कार्यक्रमात राणीने हजेरी लावली होती. त्यावेळी ती बोलत होती.

राणीचा 'मर्दानी २' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांवरील अत्याचारावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीची मुख्य भूमिका आहे. 'महिलांवर अत्याचाराला नाही म्हणा' या परिसंवादात राणी मुखर्जीसह, अभिनेत्री मुक्ता बर्वे, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते प्रवीण तरडे, जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचीही उपस्थिती होती.

राणी मुखर्जी

यावेळी विद्यार्थिनींच्या प्रश्नांना राणी मुखर्जीने दिलखुलास उत्तरे दिली.
एक महिला, आई म्हणून पार्वती बनू शकते. मात्र, त्याच आईने अत्याचारा विरुद्ध कालिका मातेचं रूप धरणं केलं पहिजे. निर्भया सारख्या घटनेने देश हादरला. मी एक महिला असून मी देखील ४ वर्षाच्या मुलाची आई आहे. प्रत्येक महिलांनी अन्यायाविरुद्ध आपल्या अंतर्गत शक्ती जागृत करायला हवी. प्रत्येक मुलीने अन्यायाविरुद्ध लढण्याचा विचार करायला हवा. प्रत्येक महिलेने सक्षम होणे गरजेचे आहे. प्रसंगी अत्याचाराविरोधात दोन हात करण्याची तयारी देखील असली पाहिजे, असे मत तिने यावेळी व्यक्त केले.

''मर्दानी २' या चित्रपटातील शिवानी शिवाजी रॉय ही माझी भूमिका आज पर्यंतच्या माझ्या कारकिर्दीतली महत्त्वाची भूमिका असल्याचं मला वाटते. शिवाजी महाराजांचं नाव माझ्या नावात वापरल्याने मला अन्यायाविरुद्ध चित्रपटात काम करतांना देखील एक प्रकारची ऊर्जा मिळाली, असंही ती म्हणाली.
'प्रत्येक पुरुषाने पत्नीला कामात प्रोत्साहन द्यायला हवे. मात्र, यासोबतच बाहेर काम करतांना महिलांनी देखील आपल्या परिवाराला वेळ देणं तितकचं महत्त्वाचे आहे. दिवस रात्र देशाची सेवा करणाऱ्या महिला पोलिसांचा मला अभिमान वाटतो. मी त्यांना मनापासून सलाम करते. तसेच सरकारने विद्यार्थिनींना शाळा-महाविद्यालया पासूनच स्वरक्षणाचे धडे देणं सक्तीचे करावे', असं मतही तिने मांडलं.

या कार्यक्रमाला शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामाजिक कार्य करणाऱ्या महिला, निर्भया पोलीस पथकातील महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित होत्या.

Intro:सरकारने शाळा आणि महाविद्यालयात विद्याथीनींना स्वराक्षणाचे धडे देणं सक्तीचे करावे-राणी मूखर्जी..

Body:शाळा आणि महाविद्यालयात विद्याथीनींना स्वराक्षणाचे धडे देणं सक्तीचे करावे असं मत अभिनेत्री राणी मूखर्जी यांनी व्यक्त केलं,नाशिक पोलीस आयोजित महिलांवर अत्याचाराला नाही म्हणा या परिसंवाद त्या बोलत होत्या....

देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत,महिलांनी सक्षम होत अन्याय, अत्याचारला विरोध करत ह्यावर आवाज उठववा ह्या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी महिलांवर अत्याचाराला नाही म्हणा या परिसंवादाचं आयोजन केलं होतं, या परिसंवादाला मर्दानी 2 ह्या चित्रपटाच्या प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेत्री मुक्ता बर्वे ,दिग्दर्शक, लेखक,अभिनेते प्रवीण तरडे, जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते...

ह्यावेळी उपस्थित पाहुण्यांनी आणि विद्यार्थिनींनी विचारलेल्याप्रश्नांना अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी दिलखुलास उत्तरे दिली,एक महिला माता म्हणून पार्वती बनू शकते,तीच अत्याचारा विरुद्ध तिने कालिका मातेचं रूप धरणं केलं पहिले असं राणी यांनी म्हटलं आहे...निर्भया सारख्या घटनेने देश हादरला,मी एक महिला असून मी देखील चार वर्षच्या मुलची आईआहे.. प्रत्येक महिलांनी अन्यायाविरुद्ध आपल्या अंतर्गत शक्ती जागृत करायला हवी, प्रत्येक मुलीने माझ्यासारखा अन्यायाविरुद्ध लढण्याच्या विचार केला पाहिजे ...माझ्या आई वडिलांनी पण माझी लहान पणी खूप काळजी घेतली मात्र सुरुवातीपासूनच मी दुर्गामातेची पूजा करत असल्याने, मीस्वतःला देखील दुर्गा मानत नेहमीचं अन्याया विरुद्ध लढत असल्याचे राणी हिने म्हटलं आहे..प्रत्येक महिलेनं देखील सक्षम होण गरजेचे आहे,अत्याचार करणार्‍या विरुद्ध दोन हात करण्याची नेहमीच तुमची तयारीअसली पाहिजे, असे मत राणी मुखर्जी हिने व्यक्त केलं, मर्दानी 2 या चित्रपटातील शिवानी शिवाजी रॉय ही माझी भूमिका आज पर्यंतच्या माझ्या कारकिर्दीतली महत्त्वाची भूमिका असल्याचं मला वाटते, शिवाजी महाराजांचं नाव माझ्या नावात वापरल्याने मला अन्यायाविरुद्ध चित्रपटात काम करतांना देखीलएक प्रकारची ऊर्जा मिळाल्याचं राणी हिने म्हटलं..प्रत्येक पुरुषाने पत्नीला कामात प्रोत्साहन द्यायला हवं, मात्र यासोबतच बाहेर काम करतांना महिलांनी देखील आपल्या परिवाराला वेळ देणं तितकचं महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले,दिवस रात्र देशाची सेवा करणाऱ्या महिला पोलिसांचा मला अभिमान वाटतं असून मी त्यांना मनापासून सलाम करत असल्याचे राणी हिने म्हटलं..तसेच सरकारने विद्यार्थिनींना शाळा-महाविद्यालया पासूनच स्वरक्षणाचे धडे देणं सक्तीचे करावे असेही राणी हिने म्हटलं...

ह्या विद्यार्थ्यांनिनं साठी स्वराक्षणाचे प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले,ह्या कार्यक्रमला शाळा,महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी,सामाजिक कार्य करणाऱ्या महिला,निर्भया पोलीस पथकातील महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित होत्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.