सदाबहार अभिनेते रमेश देव यांनी काही दिवसांपूर्वीच स्वर्गलोकी प्रवेश केला. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजनसृष्टी पोरकी झाली. एक उत्तम अभिनेता व निर्माता-दिग्दर्शक, एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे. त्यांच्या निधनानं एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आठवणी नेहमीच सर्व रसिक-प्रेक्षकांसोबत राहतील.
रमेश देव यांच्या अभिनय कारकिर्दीतील काही आठवणी त्यांनी झी मराठीवरील ‘हे तर काहीच नाय’ या कार्यक्रमात उजागर केल्या होत्या. निधनाच्या काही आठवड्यापूर्वीच अभिनेता रमेश देव यांनी ‘हे तर काहीच नाय’ या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थितीने सगळेच कलाकार भारावून गेले होते. रमेशजींनी त्यांचा आणि बच्चनजींचा एक किस्सा शेअर केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
त्यांचे किस्से ऐकून सगळ्या उपस्थित कलाकारांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. वयाच्या ९४व्या वर्षी देखील रमेशजींचा असलेला उत्साह मंचावरील सगळ्यांना खूप काही शिकवून गेला. त्यांच्या या काही गोड आठवणी त्यांच्याचकडून ऐकण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रेक्षक आगामी भागात आपल्या आवडत्या कलाकाराच्या, रमेश देव यांच्या, आठवणींचा आनंद घेऊ शकणार आहेत.
‘हे तर काहीच नाय’ हा कार्यक्रम प्रत्येक शुक्रवार आणि शनिवार रात्री झी मराठीवर प्रसारित होतो.
हेही वाचा - अजय अतुल यांच्या संगिताने नटलेली 'चंद्रमुखी’ २९ एप्रिलला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!