मुंबई - कलर्स वाहिनी डान्स रियालिटी शो ‘डान्स दिवाने’ चे तिसरे पर्व घेऊन येत आहे. गेल्या दोन पर्वातील ‘लाखों दिलोंकी धडकन’ माधुरी दीक्षित नेने व डान्सर-कोरिओग्राफर तुषार कालिया पुन्हा परीक्षण करणार असून यावर्षी त्यांच्यासोबत तिसरा जज म्हणून, डान्सर, कोरिओग्राफर, अभिनेता, मेंटॉर, रियालिटी शो जज, धर्मेश येलांडेंची वर्णी लागली आहे. ‘डान्स दिवाने’ च्या नवीन पर्वात नवीन सूत्रसंचालक येणार असून त्यासाठी ‘कॉक्रोच’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला आणि भारतातातील ‘स्लो-मोशन’ डान्सिंगचा बादशाह म्हणून नाव कमावलेल्या राघव जुयालची निवड करण्यात आली आहे. राघव ने चित्रपट व वेब सिरीज मध्ये अभिनयसुद्धा केला असून त्याच्या विनोदी ‘वन-लाइनर्स’ प्रेक्षकांना आनंदित करतात. राघवच्या सूत्रसंचालनाची ‘डान्स दीवाने‘ च्या मनोरंजन निर्देशांकात वाढ होणार यात शंका नाही.
बहु-प्रतिभावान राघव जुयालने कलर्सच्या डान्स दीवानेच्या मंचाचा होस्ट म्हणून ताबा घेतला असून ताज्या हवेच्या झुळकीच्या रुपातील त्याचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना भावेल अशी अपेक्षा आहे. त्याचे विक्षिप्त व्यक्तिमत्व, अपावादत्मक नृत्य कौशल्य (खासकरून ‘स्लो-मोशन डान्सिंग’), लोकांचे मनोरंजन करण्याची असाधारण क्षमता आणि गोष्टी मजेत घेण्याची त्याची सवय यासह तो या कार्यक्रमात नवीन 'जान' फुंकेल. डान्स रियालिटीचे स्पर्धक असताना धर्मेश व राघव यांनी आपल्या अद्वितीय डान्स-मूव्ह्सनी सर्वांना अचंबित केले होते. दोघेही दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझाचे शिष्य असून घट्ट मित्रही आहेत. हे दोघे योगायोगाने पुन्हा एका डान्स रियालिटी शोचा भाग झाले असून ‘डान्स दिवाने’ च्या टीमने राघव व धर्मेश चे जोरदार स्वागत केले आहे. सध्या या शोसाठी स्पर्धकांच्या ऑनलाईन ऑडिशन्स सुरू असून, स्पर्धक जोडीने, तिकडीने आणि ग्रुप डान्स करून परीक्षकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतील. लवकरच कलर्स वाहिनी ‘डान्स दिवाने’ चे तिसरे पर्व सुरु होण्याची तारीख प्रसिद्ध करतील.
हेही वाचा - तब्बल ७२ वर्षानंतर वॉशिंग्टनच्या हातून 'भन्नाट' कामगिरीची नोंद