ETV Bharat / sitara

कपिल शर्मा शो बंद करण्याचा निर्मात्यांचा निर्णय - Kapil Sharma in Nandita Das film

सोनी टीव्हीचा द कपिल शर्मा शो तात्पुरता बंद होणार आहे. होस्ट कपिल शर्माच्या आगामी यूएसए दौर्‍यामुळे एपिसोड शूट करण्यासाठी तो हजर राहणार नसल्यामुळे सोच्या निर्मात्यांनी काही काळासाठी शो थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

कपिल शर्मा
कपिल शर्मा
author img

By

Published : Mar 25, 2022, 3:18 PM IST

मुंबई - सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा द कपिल शर्मा शो तात्पुरता बंद होणार आहे. होस्ट कपिल शर्माच्या आगामी यूएसए दौर्‍यामुळे एपिसोड शूट करण्यासाठी तो हजर राहणार नसल्यामुळे शोच्या निर्मात्यांनी काही काळासाठी शो थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. काही भागांचे शुटिंग झाले असल्यामुळे कपिलच्या सुट्टीच्या काळात ते प्रसारित होणार असल्याचे समजते.

गेल्या वर्षी कपिल शर्माने जानेवारी 2021 मध्ये पत्नीच्या गरोदरपणात सुट्टी घेतली होती, तेव्हाही शो काही कालावधीसाठी बंद करण्यात आला होता. कपिलचा शो हा टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोमध्ये फिल्मच्या प्रमोशनसाठी सेलेब्रिटी उपस्थित राहात असतात. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाईल चित्रपटाचे या शोमध्ये प्रमोशन झाले नव्हते. त्यामुळे मध्यंतरी कपिलवर टीकाही झाली होती. मात्र अनुपम खेरने याचे कारण सांगितल्यामुळे वाद थांबला होता.

कपिल शर्मा - आय एम नॉट डन यट' या नेटफ्लिक्स शोनंतर कपिल शर्माने त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कपिल सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास यांच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अॅपलॉज एंटरटेनमेंट आणि नंदिता दास इनिशिएटिव्हजच्या वतीने या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.या चित्रपटात कपिलने फूड डिलिव्हरी रायडरची भूमिका साकारणार आहे, तर शहाना गोस्वामी त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस भुवनेश्वरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

कपिल शर्मा शोचा तिसरा सीझन सोनी टीव्हीवर प्रसारित होत आहे. या शोमध्ये किकू शारदा, कृष्णा अभिषेक, सुदेश लेहरी, भारती सिंग, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि अर्चना पूरण सिंग देखील आहेत.

हेही वाचा - Rrr : देशभर Rrr चे झंझावती वादळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.