लॉस एंजेलिस - प्रियंका चोप्राचा पती निक जोनास याचा मोटरबाईक चालवताना अपघात झाला आहे. आता आपण बरे असल्याचा खुलासा त्याने केलाय. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री त्याचा अपघात झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एनबीसी गायन स्पर्धा 'द व्हाईस'चा कोच म्हणून दोन सिझनमध्ये कोच म्हणून निक जोनास काम करीत आलाय. या शोच्या शूटिंग दरम्यान आपण जखमी झाल्याचे त्याने कळवले आहे. 'द व्हाईस'च्या सोमवारच्या एपिसोडमध्ये निकने आपल्या तब्येतीबद्दल अपडेट दिली. तो म्हणाला, "मला बरे वाटत आहे. बाईकवरुन जाताना माझा अपघात झाला. मी नेहमीसारखा उत्साही नाही पण मला पुढे जायचे आहे."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'द व्हाईस'च्या चालू असलेल्या २० व्या सीझनच्या पॅनेलमध्ये ब्लेक शेल्टन, केली क्लार्कसन आणि जॉन लेजेंड देखील आहेत.
यापूर्वी, २८ वर्षीय गायक निक जोनासला २०१८मध्ये मेक्सिकोमध्ये शो-पोस्ट वर्कआउट दरम्यान हाताला दुखापत झाली होती.
हेही वाचा - टीका करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याने केले सोनू सूदच्या कामाचे कौतुक