मुंबई - बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा सध्या तिच्या करिअरकडे लक्ष देत आहे. बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. लग्नानंतर पुन्हा एकदा तिने बॉलिवूड चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मागच्या वर्षी ती 'द स्काय इझ पिंक' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. आता लवकरच ती अॅमेझॉनच्या 'शीला' या चित्रपटात 'मां आनंद शीला' यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यापूर्वी एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी ती भारतात परतली आहे.
प्रियांकाला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी ती पांढऱ्या रंगाच्या टीशर्ट आणि ब्ल्यू डेनिम जीन्समध्ये अतिशय सुंदर दिसत होती. विमानतळावर तिने चाहत्यांसोबत सेल्फी देखील घेतल्या.
हेही वाचा -पाकिस्तानातील लग्नाला शत्रुघ्न सिन्हांची हजेरी, झाले सोशल मीडियावर ट्रोल
१९ जानेवारीला देखील ती 'उमंग अवार्ड्स' सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात परतली होती.
अॅमेझॉनच्या 'शीला' चित्रपटातील भूमिकेमुळे ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. प्रियांका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्स आणि जेसन सोसनॉफ द्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. निक यारबोर या चित्रपटाची कथा लिहणार आहे.
याशिवाय, प्रियांका यावर्षी नेटफ्लिक्सच्या 'द व्हाईट टायगर' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. यामध्ये ती राजकुमार रावसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.