ETV Bharat / sitara

'टपोऱ्या डोळ्यात'मध्ये झळकतोय ‘बॉईज २' फेम प्रतिक लाड!

author img

By

Published : Dec 1, 2021, 3:15 PM IST

नवीन गाणे 'टपोऱ्या डोळ्यात' हे एक रोमँटिक सॉंग असून यांत प्रियकर आणि प्रेयसीच्या प्रेमाचे अचूक वर्णन करण्यात आले आहे. या गाण्याचे विशेष म्हणजे या गाण्यात 'बॉईज २' चित्रपटातील अभिनेता प्रतिक लाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आताच्या तरुणाईला भावेल असे हे गाणे असून प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर हे गाणे रुळेल यांत शंकाच नाही. प्रतिकचा धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला या गाण्यातून प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे.

'टपोऱ्या डोळ्यात' रोमँटिक सॉंग रिलीज
'टपोऱ्या डोळ्यात' रोमँटिक सॉंग रिलीज

हल्ली म्युझिक सिंगल्सचा जमाना आहे आणि रोज नवनवीन छान छान गाणी संगीतप्रेमींच्या सेवेत रुजू होत असतात. त्यातच आता बरेच सेलेब्रिटी या गाण्यातून दिसतात त्यामुळे प्रेक्षकांना दुहेरी फायदा मिळत असतो. एक नवीन गाणे 'टपोऱ्या डोळ्यात' हे एक रोमँटिक सॉंग असून यांत प्रियकर आणि प्रेयसीच्या प्रेमाचे अचूक वर्णन करण्यात आले आहे. या गाण्याचे विशेष म्हणजे या गाण्यात 'बॉईज २' चित्रपटातील अभिनेता प्रतिक लाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आताच्या तरुणाईला भावेल असे हे गाणे असून प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर हे गाणे रुळेल यांत शंकाच नाही. प्रतिकचा धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला या गाण्यातून प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'चेतन गरुड प्रॉडक्शन'च्या दिलखेच गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून 'खंडेराया झाली माझी दैना', 'दिवाना' या गाण्यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर 'टपोऱ्या डोळ्यात' हे नवे गाणे चेतन गरुड प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. 'चेतन गरुड प्रॉडक्शन'च्या एकामागोमाग एक दिलखेच गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली असून प्रेक्षकांच्या हट्टापायी ते 'टपोऱ्या डोळ्यात' हे गाणे घेऊन आले आहेत. 'चेतन गरुड प्रॉडक्शन' आणि विकास दुबे निर्मित 'टपोऱ्या डोळ्यात' हे गाणे युट्युब चॅनेलवर झळकले असून या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. अभिनेता प्रतिक लाड आणि अभिनेत्री सोनाली दळवी यांची लव्हेबल केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळणार आहे.

हे गाणे पंकज दत्तू वारुंगसे यांनी लिहिले असून या गाण्याला संगीतबद्ध करण्याची धुराही त्यांनीच पेलवली आहे. तर गायक ऋषिकेश शेलार याने हे गाणे स्वरबद्ध केले आहे. प्रोजेक्ट हेड म्हणून चेतन रविंद्र गरुड यांनी स्वतः बाजू सांभाळली असून चेतन महाजन आणि राहुल जी यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली हे गाणे दिग्दर्शित करण्यात आले आहे. या गाण्याचे नयनरम्य चित्रीकरण कॅमेरामॅन रुपेश पैकराव याने आपल्या कॅमेरात कैद केले आहे. हे गाणे चेतन गरुड प्रॉडक्शन यांच्या युट्युब चॅनेलवर तसेच इतर सोशल पोर्टल्सवर पाहता येणार आहे.

प्रेक्षकांना प्रतिक लाडचा रोमॅंटिक आणि थोडासा विनोदी अभिनय 'टपोऱ्या डोळ्यात' बघायला मिळेल आणि ती एक औसुक्त्याची बाब ठरणार आहे.

हेही वाचा - दीपिका पदुकोण एअरपोर्ट लूकमुळे ट्रोल, नेटिझन्स म्हणाले, "दर्जा घसरला"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.