मुंबई - अश्लिल चित्रपट प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला समन्स बजावले आहे. क्राईम ब्रँचने समन्स बजावल्यानंतर गहनाने सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून वारंवार होत असलेल्या चौकशीच्या फेऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गहना म्हणते मी म्हणजे काही चालता बोलता कंप्युटर नाही.
गहनाला पोलीस स्टेशनमध्ये रविवारी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु ती हजर झाली नव्हती. मुंबईच्या बाहेर असल्यामुळे हजर होण्यास उशीर लागत असल्याचे तिने म्हटले होते. सोमवारी गहनाने यावर एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. यात तिने म्हटलंय की पहिल्यांदा मी 14 दिवसांच्या पोलीस कस्टडीमध्ये होते. त्यानंतर आठदिवस मालवणी पोलिसांसोबत होते. सीआयडी डीसीबी टीमने माझे तिनही फोन, लॅपटॉप, सर्व अकाऊंट्स..पासवर्ड घेतले. मला माहिती असलेली सर्व गोष्टी मी त्यांना सांगितल्या.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
त्याला आता सहा महिने झाले. माहितीची शहानिशा करण्यासाठी त्यांच्याकडे उत्तम फॉरेन्सीक टीम आहे. मग अजून काय विचारायचे राहिलंय..
ज्यांचे नंबर हवे तेही मी दिले आहेत. जर मी चुकीची असते तर माझे तोंड मी बंद ठेवले असते, जो माझा अधिकार आहे. तरीही मी सहकार्य केले.
पाच महिने तुरुंगात घालविल्यानंतर मला त्याच खटल्यात जामीन मिळाला. यानंतरही मी सीआयडी डीसीबी कार्यालयात गेले. त्यानी माझी सुमारे 4 तास चौकशी केली. ते आता मला का कॉल करीत आहेत? माझ्या शरीरात चिप तर लागलेली नाही. किंवा मी चालता बोलता कंप्यटर तर नाही. किंवा मी पैसे खाण्याचे मशीन तर नाही जे मी एका बाजूला खाते आणि दुसर्या बाजूने बाहेर येते. तुम्हा लोकांकडे सर्व काही आहे, आता काय हवंय..?''
गहना वशिष्ठची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनली आहे. राज कुंद्रा अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणात अडकल्यापासून गहना नेमी त्याची पाठराखण करीत असते. कुंद्रा हा पॉर्न फिल्म बनवीत नव्हता तर इरॉटिक सिनेमा बनावयचा असा युक्तीवाद केला जात आहे. गहनाही तसेच सांगत असते.
हेही वाचा - बलात्काराचा प्रयत्न केल्याचा 'केआरके'वर मॉडेलचा आरोप, एफआयआर दाखल