मुंबई - जेम्स बॉन्डच्या सीरिजमधील २५ वा 'नो टाइम टू डाय' या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अभिनेता डॅनियल क्रेग या सीरिजमुळे जेम्स बॉन्ड या नावानेच लोकप्रिय आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहते उत्सुक आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, भोजपुरी, बंगाली, मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा मराठी ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
'नो टाइम टू डाय' हा चित्रपट ३ एप्रिल एवजी आता २ एप्रिलला भारतात प्रदर्शित होणार आहे. संपूर्ण आठवड्याचा चित्रपटाच्या कमाईसाठी फायदा व्हावा, यासाठी या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -एकदिवस आधीच प्रदर्शित होणार जेम्स बॉन्डचा चित्रपट, नवी रिलीज डेट जाहीर
डॅनियलने २००६ साली 'कसिनो रॉयल' मधून 'जेम्स बॉन्ड'च्या सीरिजमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर त्याने 'क्वांटम ऑफ सोलेस', 'स्कायफॉल' आणि 'स्पेक्ट्रम' यामध्ये जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती. 'स्कायफॉल' या सीरिजने ब्रिटनच्या बॉक्स ऑफिसवर बरेच विक्रम रचले होते.
आता 'नो टाइम टू डाय' या चित्रपटातून पुन्हा एकदा डॅनियल जेम्स बॉन्डच्या रुपात दिसणार आहे. कॅरी फुकुनागा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. जेम्स बॉन्डसोबतच बॉन्ड गर्ल्सचीही चर्चा पाहायला मिळते. 'नो टाइम टू डाय' मध्ये अना दे अमर्स ही बॉन्ड गर्ल बनणार आहे. तर, ऑस्कर विजेता अभिनेता रामी मालेक हा विलनच्या भूमिकेत झळकणार आहे. यांशिवाय, दाली बेनसाला आणि लॅशा लिंच या कलाकारांची देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.