ETV Bharat / sitara

'केबीसी'साठी निर्माता नितेश तिवारी आले कॅमेऱ्यासमोर, ९ वर्षांची मुलगी बनली सिनेमॅटोग्राफर - निर्माता नितेश कुमार आले कॅमेऱ्यासमोर

लॉकडाऊनने चित्रपट निर्माता नितेश तिवारी यांना कॅमेऱ्यासमोर उभं केलं आहे. तर त्यांची नऊ वर्षांची मुलगी अमारिसालाही कौन बनेगा करोडपतीच्या स्क्रॅच फिल्मसाठी सिनेमॅटोग्राफर बनण्याची संधी मिळाली आहे. नव्या अभियानात अमिताभ बच्चन शोसाठी स्पर्धकांना आमंत्रित करताना दिसणार आहेत. मात्र, बिग बींच्या या नितेश तिवारी यांनी एक स्क्रॅच फिल्म तयार केली.

निर्माता नितेश तिवारीआले कॅमेऱ्यासमोर
निर्माता नितेश तिवारीआले कॅमेऱ्यासमोर
author img

By

Published : May 7, 2020, 10:07 AM IST

नवी दिल्ली - लॉकडाऊनने चित्रपट निर्माता नितेश तिवारी यांना कॅमेऱ्यासमोर उभं केलं आहे. तर त्यांची नऊ वर्षांची मुलगी अमारिसालाही कौन बनेगा करोडपतीच्या स्क्रॅच फिल्मसाठी सिनेमॅटोग्राफर बनण्याची संधी मिळाली आहे. नव्या अभियानात अमिताभ बच्चन शोसाठी स्पर्धकांना आमंत्रित करताना दिसणार आहेत. मात्र, बिग बींच्या या नितेश तिवारी यांनी एक स्क्रॅच फिल्म तयार केली.

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे या फिल्मचं चित्रीकरण घरीच केलं गेलं आहे. याशिवाय तिवारी यांनी सर्व सूचनांचं पालन करत खबरदारी घेऊनच प्रोमोचं दिग्दर्शन केलं आहे. तिवारींनी सांगितलं, की हा माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव आहे. कलाकारापासून इतकं दूर राहून आजपर्यंत मी कोणत्याच चित्रपटाचे चित्रीकरण केले नाही. हा अनुभव माझ्यासाठी खास आहे.

पुढे ते म्हणाले, जेव्हा आम्ही हे कैम्पेन लिहित होतो, तेव्हाच आम्हाला या मर्यादांची कल्पना होती. त्यामुळे आम्ही ते अगदी सरळ आणि सोपं ठेवलं. यादरम्यान माझं अनेकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत बोलणं झालं. त्यांना या गोष्टी अधिक सहज करुन देण्याचा प्रयत्न केला, कारण ते घरीच याचं शूटिंग करणार होते

यासाठी मी आधी स्वतः एक स्क्रॅच फिल्म बनवली. माझ्या मुलीने यासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून कामं केलं. ही फिल्म एडिट करुन अमिताभ यांना पाठवली. जेणेकरुन त्यांना याबद्दल कल्पना येईल. यानंतर अमिाताभ यांनी पुढचं काम केल्याचं नितेश यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.