ETV Bharat / sitara

घरातील ‘बॉस’ ऑफिसमध्येही ‘बॉस’, ‘बॉस माझी लाडाची’!

author img

By

Published : Feb 22, 2022, 8:00 PM IST

'बॉस माझी लाडाची' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांना दररोज रात्री ही मालिका पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि नवोदित अभिनेता आयुष संजीव हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गिरीश ओक, रोहिणी हट्टंगडी, माधवी जुवेकर हे नावाजलेले कलाकारही या मालिकेत आहेत.

बॉस माझी लाडाची
बॉस माझी लाडाची

मुंबई - घरातली बायकोच ऑफिसमध्येसुद्धा बॉस असेल तर नवऱ्याची काय परिस्थिती होईल याचा विचारच केलेला बरा. परंतु असा विचार घेऊन एक मालिका दाखल होतेय , जिचं नाव आहे, 'बॉस माझी लाडाची'.

एक नवी कोरी मालिका सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'बॉस माझी लाडाची' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांना दररोज रात्री ही मालिका पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि नवोदित अभिनेता आयुष संजीव हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गिरीश ओक, रोहिणी हट्टंगडी, माधवी जुवेकर हे नावाजलेले कलाकारही या मालिकेत आहेत.

बॉस माझी लाडाची

या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये बऱ्याच काळाने छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. भाग्यश्रीने याआधीही आपल्या अभिनयाने आणि निरागसतेने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण या वेळी मात्र ती एका ‘कडक’ बॉसच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आयुष संजीव हा मालिकेत मुख्य भूमिका पहिल्यांदाच साकारतो आहे. या मालिकेद्वारे ऑफिसमधली धमाल प्रेमकहाणी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

बॉस माझी लाडाची

घरची बॉस तर बायको असतेच पण जेव्हा ऑफिसची बॉसही बायको असते, तेव्हा मात्र काही खरं नाही. अशीच गत झाली आहे मिहिरची कारण त्याची बायकोच आहे त्याची बॉस. बॉस राजेश्वरी आणि कर्मचारी मिहिर यांची ही गोष्ट आहे. यांचं गोड असं एक कुटुंब आहे ज्यात आजी, आजोबा, काका, काकू, भावंडं आणि एवढंच नाही तर एक मांजरसुद्धा आहे. आता हे गोड कुटुंब, बॉस-बायको राजेश्वरी आणि मिहिर या सगळ्यांना प्रेक्षक लवकरच भेटू शकणार आहेत. मालिकेच्या प्रोमोवर उत्तम प्रतिक्रिया आल्या असून सगळ्यांनाच ही नवी मालिका बघण्याची उत्सुकता आहे.

मनवा नाईक हिच्या स्ट्रॉबेरी या निर्मिती संस्थेची ही मालिका आहे. २८ फेब्रुवारीपासून दररोज रात्री ८:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर 'बॉस माझी लाडाची' ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

हेही वाचा - Vasantrao Deshpande Biopic : ‘मी वसंतराव’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्यासमोर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.