नाट्यदिंडीसाठी संत्रानगरी सज्ज, मारबत आणि बडग्या ठरणार आकर्षण
नागपूर - आजपासून ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात होत आहे. संमेलनाची सुरूवात नाट्य दिंडीने होणार असून यासाठी संत्रानगरी सज्ज झाली आहे. या दिंडीचे वैशिष्ठ्य असणार आहे त्या पिवळी मारबत, काळी मारबत आणि बडग्या यांचे आकर्षक पुतळे.
देशात असलेली सर्व प्रकारची रोगराई नष्ट व्हावी, देशद्रोही कारवाया संपुष्ठात याव्यात म्हणून या खास विदर्भातील लोकसंस्कृतीच्या प्रतिकांचा वापर मिरवणुकीत केला जाणार आहे.
या संमेलनासाठी देशभरातून कलावंत आणि रसिक नागपुरात दाखल झाले आहेत. ज्येष्ठ नाटककार मेहश एलकुंचवार यांच्या हस्ते आज सायंकाळी या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.
रेशीमबाग येथील पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंचावर सायंकाळी साडेसहा वाजता संमेलनाचे उद्धाटन होणार आहे. यावेळी संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गजवी, विद्यमान अध्यक्ष कीर्ती शिलेदार उपस्थित राहणार आहेत.