ETV Bharat / sitara

स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसोबत काम करायला आवडते - नसिरुद्दीन शाह

author img

By

Published : Aug 17, 2019, 1:35 PM IST

नसिररुद्दीन शाह यांनी अनेक नव्या दिग्दर्शकांसोबत शेकडो चित्रपटातून काम केले. एखादा नवा दिग्दर्शक आपल्यासारख्या कलाकारासोबत काम करताना काय विचार करु शकेल याचा पूर्ण अंदाज शाह यांना आहे. डोळ्यात स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसोबत काम करायला आवडते असे त्यांनी म्हटलंय.

नसिरुद्दीन शाह

मुंबई - नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या तरुण वयातच करियरची निवड केली होती. या क्षेत्रात प्रचंड संघर्ष करावा लागतो याची कल्पना त्यांना होती. मात्र सर्व अडथळे पार करुन यश मिळवता येईल ही जिद्द मनी ठाम होती.

नसिररुद्दीन यांनी ७० आणि ८० च्या दशकात अनेक समांतर चित्रपटात काम करुन आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. यात त्यांनी अनेक नव्या दिग्दर्शकांसोबत काम केले.

"मी कधीही निराश झालो नाही कारण मला यश येण्याची अपेक्षा नव्हती," असे नसिरुद्दीन यांनी सांगितले. त्यांनी अभिनयाची सुरूवात कशी केली हे ते सांगत होते.

"मी बऱ्याच कठोर संघर्षासाठी तयार होतो. मी सहजपणे पराभव स्वीकारण्यासही तयार नव्हतो. अपयशाचा विचारदेखील माझ्या मनात आला नाही. यात अडथळे येणार याची मला कल्पना होती.

"मी अयशस्वी होण्याचा विचार कधीच केला नाही. मग काय होईल?" मी या बद्दल कधीही विचार केला नाही. मला शक्य आहे तितके चांगले व्हावे लागेल. जर मला काय काम करायचे आहे हे माहित असेल तर मी काम मिळवेन ही माझी श्रद्धा होती. आजही माझ्या विचारात बदल झालेला नाही. खरं तर माझ्या डोक्यात आता ही गोष्ट घट्ट बसली आहे.", अनुभवाचे बोल ते सांगत होते. शॉर्ट टीव्हीच्या बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टीव्हलमध्ये हाफ फुल्ल फिल्मला विजेतेपद मिळाले त्या प्रसंगी नसिरुद्दी शाह बोलत होते.

"मला आठवतंय की प्रत्येक प्रवासात मला मदत करणारा हात मिळाला नसता तर कदाचित मी हा प्रवास केला नसता. मला तरुणांसोबत काम करायला आवडतं, त्यांच्या डोळ्यांत स्वप्ने पहायला आवडतात. आजही ते मला मानतात, विश्वास ठेवतात आणि काम करु इच्छितात.

"तरुण पिढीला मी हवे असलेले वाटणे माझ्यासाठी खूप प्रोत्साहनदायक आहे. मी अनेक दिग्दर्शकांसोबत पहिल्यांदा काम केले, असे शेकडो चित्रपट केले आणि याबद्दल मला खेद वाटला नाही."

एखादा नवा दिग्दर्शक आपल्यासारख्या कलाकारासोबत काम करताना काय विचार करु शकेल याचा पूर्ण अंदाज शाह यांना आहे.

"मला ते ( नवख्या दिग्दर्शकांची अडचण ) समजले आहे पण तसे होऊ नये म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करतो. जर मला दिग्दर्शकावर विश्वास नसेल तर बहुधा मी त्या व्यक्तीबरोबर काम करू शकत नाही."

शाह स्वत: विविध विषयांवर आणि शैलींवरील शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याचा आनंद घेत आहेत. शॉर्ट फिल्म करणे सोपे नाही , असे त्यांना वाटते. एखादा विषय समजून घेण्यासाठी लोकांना तीन तासांचा वेळ घालवणे योग्य वाटत नाही, असेही ते पुढे म्हणाले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.