नाशिक - आता पर्यंत पैसे, जमीन, वाहन चोरीच्या घटना आपण ऐकल्या असतील. मात्र आता चक्क गाणचं चोरल्याचा आरोप संगीतकारांनी गायकांवर केला आहे.
महाराष्ट्रात प्रत्येकाच्या तोंडी असलेलं "ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट" हे गाणं काही वेळातच इतकं लोकप्रिय झालंय, की आता थेट हे गाणं चोरले गेलंय. या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार संध्या केशे, प्रनिकेत खुणे यांनी हे गाणं गायक उमेश गवळी यांनी चोरल्याचा आरोप केला आहे. तसेच हे गाणं युट्यूब वरून काढल्याचं ही म्हटलं आहे.
या गाण्याचे व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रॉडक्शन टीमने सुद्धा संध्या आणि प्राणिकेतच्या दाव्याला पुष्टी केलीय. या गाण्यातील अभिनेता गोपाळ गोसावी यानं सुद्धा ही सर्व मेहनत या दोघांची असल्याचं सांगितल्याने त्यांना पाठींबा दिला आहे. एखाद्या विषयाला लोकप्रियता आली की त्यामागे वादही चालून येतात, श्रेय घेण्यासाठी भांडणं होतंच. मात्र आता या गाण्यातून मिळणाऱ्या पैशासाठी हा विषय थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचला आहे.
पुणे पोलिसात तक्रार दाखल..
''ओ शेठ...'' या गाण्याचा गायक उमेश गवळीने युट्युब वर कॉपीराईटचा हक्क दाखल करत संध्या आणि प्रणीकेतला बेदखल केलंय. पुणे शहर बिबेवाडी पोलिसात तशी तक्रार दाखल करत आपला मालकी हक्क असल्याचा दावा केलाय. मात्र, 'चोर तो चोर वर शिरजोर', असे आरोप संध्या आणि प्रनिकेतने केला आहे.
हेही वाचा - धर्मेंद्रच्या आयकॉनिक स्टेप्सवर थिरकली हेमा मालिनी, ड्रीम गर्लवर शिल्पा फिदा