ETV Bharat / sitara

१० गाणी असलेल्या ‘मुंबई डायरीज 26/11'च्या म्यूझिक अल्बमचे झाले अनावरण!

author img

By

Published : Sep 8, 2021, 7:18 PM IST

अमेझॉन प्राईम व्हिडीओची प्रस्तुती असलेल्या 'मुंबई डायरीज़ 26/11' च्या म्यूझिक अल्बममध्ये दहा भावपूर्ण साउंडट्रॅक सामील आहेत. नुकतेच या सिरीजच्या म्युझिक अल्बमचे अनावरण करण्यात आले. 'मुंबई डायरीज़ 26/11' चा वैश्विक प्रीमियर ९ सप्टेंबर, २०२१ ला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर होणार आहे.

मुंबई डायरीज 26/11' म्यूझिक अल्बम
मुंबई डायरीज 26/11' म्यूझिक अल्बम

‘मुंबई डायरीज 26/11’ ही मालिका, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी ज्यांनी २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतावादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांची अप्रकाशित कथा सादर करते. नुकतेच या सिरीजच्या म्युझिक अल्बमचे अनावरण करण्यात आले. अमेझॉन प्राईम व्हिडीओची प्रस्तुती असलेल्या 'मुंबई डायरीज़ 26/11' च्या म्यूझिक अल्बममध्ये दहा भावपूर्ण साउंडट्रॅक सामील आहेत. ये हालात, तू दफन भी, पार होगा तू, अनन्या का थीम- इनर स्ट्रेंथ, द डिपार्टेड, द ऑफ्टरमॅथ, फ्लॅशिंग बॅक, दिया थीम- ऑन थिन आइस, प्रोफेट्स ऑफ डूम आणि मुंबई डायरीज टाइटल थीम यांचा समावेश आहे.

संगीतकार आणि निर्माता आशुतोष फाटक यांनी या गाण्यांवर संगीतोपचार केले आहेत. ये हालात, तू दफ़न भी आणि पार होगा तू या गाण्याचे बोल नीरज अय्यंगार यांनी लिहिले असून जुबिन नौटियाल आणि जारा खान (ये हालात), नसीरुद्दीन शाह आणि अल्तमश फरीदी (तू दफ़न भी) आणि आनंद भास्कर (पार होगा तू) यांनी आवाज दिला आहे. ही सर्व गाणी सिरीजच्या कथानकासमवेत ताळमेळ साधतात आणि प्रभावशाली संदेश देतात.

निखिल अडवाणीद्वारे रचित, एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी निर्मित आणि निखिल अडवाणी आणि निखिल गोन्सालविस सहदिग्दर्शित ‘मुंबई डायरीज़ 26/11' या मालिकेमध्ये कोंकना सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलवडी सारखे अनेक प्रतिभावान आणि गुणी कलाकार आहेत.

'मुंबई डायरीज़ 26/11' चा वैश्विक प्रीमियर ९ सप्टेंबर, २०२१ ला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर होणार आहे.

हेही वाचा - सलमान खानला दिलासा, 'सेलमन भोई' गेम हटवण्याचा कोर्टाने दिला आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.