मुंबई - कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकार सोशल मीडियाचा आधार घेऊन जनजागृती करत आहेत. कोरोनाला न घाबरता योग्य खबरदारी घेतल्यास कोरोनाचा सामना करू शकतो, असे हे कलाकार आपल्या व्हिडिओद्वारे किंवा सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगत आहेत. मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने देखील एका कवितेच्या माध्यमातून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा -'घाबरू नका, सरकारी नियम पाळा'... भारत गणेशपुरे यांचे आवाहन
मुक्ताने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी हिंमत देणारी एक सुंदर कविता शेअर केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'दूर वाट खडकाळ, अंधारले रानोमाळ
डोळ्यापुढे प्रकाशाचा झोत, दिसू दे
वाट आहे वळणाची उताराची चढणाची,
इडा- पिडा, अडसर दूर होऊ दे
रानामध्ये वणव्याचा आगगोळा पेटलेला
आगीवर पावसाचे थेंब पडू दे
रात इथे थबकावी, दिवसाला जाग यावी
उद्याच्या प्रकाशाची आज गाज मिळू दे..', अशा ओळींची कविता मुक्ताने लिहिली आहे. तसेच 'मी आणि माझ्या घरची मंडळी काळजी घेत आहोत, तुम्हीही स्वतः ची नीट काळजी घ्या. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनीच हे संकट लवकर दूर होईल', असे तिने या कवितेसोबत लिहिले आहे.
हेही वाचा -बुडापेस्टमधून परतलेल्या शबाना आझमी देखील आयसोलेशनमध्ये