मुंबई - शक्तीमान फेम मुकेश खन्ना यांच्या निधनाची बातमी अचानक सोशल मीडियावर झळकू लागली होती. ही बातमी ऐकून चाहते निराश होऊ लागले. पण ही केवळ अफवा असल्याचे खुद्द मुकेश खन्ना यांनी खुलासा केला आहे. आपली तब्येत ठीक असल्याचे खन्ना यांनी सांगितले.
एका आघाडीच्या वाहिनीशी खास संभाषणात मुकेश खन्ना म्हणाले की, ''फेसबुकवर माझ्या मृत्यूची बातमी सुरू आहे. चाहत्यांना कळू द्या की मी निरोगी आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मला सतत फोन कॉल येत असतात. मी माझ्या बहिणीसाठी आयसीयू बेड शोधत आहे. माझ्या बहिणीला दिल्लीत आयसीयू बेड पाहिजे आहे.'
कोरोना काळातील सतर्कतेबद्दल मुकेश म्हणतात, ''मी नियमांचे पूर्णपणे पालन करीत आहे. एका वर्षापासून कोणत्याही पार्टीला किंवा कार्यक्रमांना गेलेलो नाही. माझ्या चाहत्यांनी सर्व नियम पाळावेत अशी माझी इच्छा आहे.''
खुद्द मुकेश खन्ना यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून आपल्या चाहत्यांना त्यांनी पूर्णपणे ठीक असल्याचे सांगितले आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता म्हणतो, "मी पूर्णपणे ठीक आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. मला या अफवाचा खंडन करण्यास सांगण्यात आले आहे आणि मी त्यासोबत निषेधही करतो.''
''लोक ज्या प्रकारे विषाचा प्रसार करतात, हीच सोशल मीडियाची समस्या आहे. मी सांगेन की मी पूर्णपणे ठीक आहे आणि तुमचे आशिर्वाद माझ्यासोबत आहेत. जेव्हा तुमची प्रार्थना माझ्या सोबत असताना माझे कोणीही काही बिघडवू शकत नाही. मला खूप कॉल येत आहेत. म्हणून मला वाटले की मी ठीक आहे हे प्रेक्षकांना सांगावे.'', असे सांगत मुकेश खन्ना यांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितले.
हेही वाचा - प्रभासमुळे वाचणार 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांचे ढासळणारे बजेट?