ETV Bharat / sitara

विवाहानंतर मैत्रीणींसह गोव्यात पार्टी करताना दिसली मौनी रॉय - मौनी रॉय ग्रँड पार्टी

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मौनी रॉयने गोव्यात तिच्या मैत्रिणींसाठी ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचे फोटो आता समोर आले आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय पोपटी हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

मौनी रॉयची मैत्रीणींसह गोव्यात पार्टी
मौनी रॉयची मैत्रीणींसह गोव्यात पार्टी
author img

By

Published : Jan 28, 2022, 7:01 PM IST

मुंबई - टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉयने 27 जानेवारी रोजी बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत सात फेरे घेतले आहेत. मौनीने दक्षिण भारतीय आणि बंगाली संस्कृतीच्या पध्दतीने लग्न केले. मौनी रॉय आणि सूरज यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मौनी रॉयची गोव्यात पार्टी
मौनी रॉयची गोव्यात पार्टी

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मौनी रॉयने गोव्यात तिच्या मैत्रिणींसाठी ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. लग्नानंतर मौनीचे फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय पोपटी हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

मौनी रॉयची मैत्रीणींसह गोव्यात पार्टी
मौनी रॉयची मैत्रीणींसह गोव्यात पार्टी

या फोटोंमध्ये मौनी रॉयच्या हातात मेहंदी आणि कपाळावर सिंदूर दिसत आहे. मौनीने लग्नाच्या वेळी घातलेला काकणांचा चुढा काढला आहे आणि त्या जागी दोन बांगड्या घातल्या आहेत.

सूरज नांबियारसोबत मौनी रॉय
सूरज नांबियारसोबत मौनी रॉय

मौनी रॉयने तीन वर्षे अफेअर केल्यानंतर सूरज नांबियारशी लग्न केले आहे. 2019 च्या न्यू इयर पार्टीमध्ये दोघांची भेट झाली होती, तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.

सूरजसोबतच्या नात्याबद्दल अभिनेत्री कधीच उघडपणे बोलली नाही. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची भूमिका असलेल्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा - देवाबद्दलच्या वादग्रस्त विधानानंतर श्वेता तिवारीने मागितली माफी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.